नगर - धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम होत असतात. त्यातून गरजू नागरीकांची सेवा घडत असते. गेल्या अनेक वर्षापासून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने विविध धार्मिक सण, उत्सवआणि महापुरुषांच्या जयंत्यानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवुन गोर गरीबांची सेवा होत आहे. आज गणेश उत्सावानिमित्त आयोजित नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून अनेकांचे यशस्वी शस्त्रक्रिया झाले आहेत. फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे कार्य गरजूंना आरोग्य सेवा देत असल्याचे प्रतिपादन पद्मशाली सोशल फाऊंडेशनचे सचिव अजय लयचेट्टी यांनी केले.
गणेश उत्सावानिमित्त फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पद्मशाली सोशल फाऊंडेशचे सचिव अजय लयचेट्टी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. याप्रसंगी फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, प्रकाश धर्माधिकारी, इंजि.अक्षय बल्लाळ, अश्विनी बल्लाळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले की, फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे एकच उद्देश आहेत. तो म्हणजे गरजूंना आरोग्य सेवा देणे, त्या माध्यमातून आजपर्यंत अनेक शिबीरांच्या माध्यमातून मदतीचा हात देत आहोत. मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे म्हणजे गोर गरीबांना परवडत नाही. त्यांच्याकडे आर्थिक कमरता असते. कुटूंबांचे अनेक समस्यांमुळे ते मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना दृष्टी गमवावी लागते. अशा गरजूंना मदत मिळाली, यासाठी फिनिक्सच्या माध्यमातून शिबीरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बुधराणी हॉस्पीटलचे मिरा पठारे, विशाल भिंगारदिवे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबीरात 213 रुग्णांची नेत्र तपासणी करुन त्यात 49 रुग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील बुधराणी हॉस्पीटलला पाठविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौरभ बोरुडे, आकाश धाडगे, विशाल गायके यांच्यासह फिनिक्सचे कार्यकत्यांनी परिश्रम घेतले

Post a Comment