(अरणगाव )मेहराबाद तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणच्या ग्रामीण भागातील संस्कार प्ले ग्रुप व नर्सरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विद्यालयांमध्ये आयोजित केली होती पुस्तक हंडी या पुस्तकांच्या रूपाने विद्यार्थ्यांनी छोट्या लहान दोस्तांसाठी असणारे विविध गोष्टीचे व बडबडगीतांचे पुस्तके शाळेमध्ये एकत्र आणले व त्या सर्वांचा त्यांनी गोपाळकाला केला व पुस्तकांचे रूपाने आजची कृष्ण जन्माष्टमी उत्साहामध्ये साजरी केली यावेळी पालकही मोठ्या संख्येने आपल्या छोट्या बालगोपाळांचा कौतुक करण्यासाठी उपस्थित होते आजच्या मोबाईल व सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती पासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी वाढवण्यासाठी उपयोग ठरू शकतो या सर्वांचे आभार स्कूलच्या संचालिका प्राध्यापिका सौ अमृता अमोल देवकर यांनी व्यक्त केले🙏
Post a Comment