आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला काम देऊन भ्रष्टाचार केला नितीन भुतारे यांचा आरोप
७५ लाख रुपयातील ४५लाख ठेकेदाराच्या घशात
अहमदनगर महानगरपालिकेत शहारा अंतर्गत वुक्षारोपण करण्याकरिता सुमारे ७५ लाख रुपये निधी हा शासनाचा असुन या मध्ये मोठा भ्रष्टाचार होतांना दिसून येते आहे सुमारे ५०००झाडे ही महानगर पालिकेच्या ४ विभाग अंतर्गत लावायची आहे. ट्रिगार्ड ने सुरक्षित मजबुतीकरण करून २वर्ष देखभाल करून जगवायची आहेत त्यासाठी राखण करण्यासाठी पाणी देण्यासाठी माणसाची नेमणूक करणे गरजेचे आहे. परंतु ठेकेदार मे. चेतन मारुती जाधव या ठेकेदाराला काम दिले ते या सर्व बाबी निविदेनुसार करतांना दिसत नाही. कुठेही झाडांना ट्रिगार्ड ने सुरक्षित ठेवण्यात आले नाही पाणी घालताना मनुष्य उपलब्ध नाही. त्यामुळे हा ७५ लाख रुपये खर्च वाया जाणार आहे असेच प्रकार मागील अनेक वर्षांपासून महानगर पालिकेत सुरू आहेत करोडो रुपयांचे वृक्षारोपण करून लाखो झाडे लावली पण आज जगलेली कुठेही दिसत नाही ठेकेदार व अधिकारी पोसण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे
तोच प्रकार ही निविदा प्रक्रिया राबविताना दिसून आला . जी झाडे ठेकदाराला लावायची ती झाडे खाजगी त्यांची किंमत २०० ते ३०० रुपये आहे असे असतानाही निविदेत ठेकेदाराला १२५० रुपया प्रमाणे दर महागरपलिकेने ठरवुन दिलाय यातच प्रत्येकी झाडाला त्यात प्लास्टिक किंवा बांबूचे ट्रिगार्ड लावून देयायचे मजबुतीकरण करून देयाचेत पण ते कोठेही दिसत नाही त्यामुळे झाडामागे प्रत्येकी ९०० रुपये कमाई करतांना ठेकेदार दिसत आहे जर आपण पाहिले तर ५००० झाडांमध्ये ७५ लाख रुपयांच्या निविदेत ४५ लाख रुपये लुटण्याचा प्रकार महानगर पालिका अधिकारी तसेच ठेकेदार करत आहे . असा आरोप युवा नेते नितीन भुतारे यांनी केला आहे.वृक्षारोपण करतांना खड्डे खोदाई व त्यासाठी लागणारे खत याचा खर्च ठेकेदाराकडून केला जातो परंतु हा खर्च ठेकेदारा कडे नसुन महानगर पालिका वृक्षारोपण करण्याकरिता खड्डा खोदाई खर्च तसेच खतांचा खर्च महानगर पालिका करणार अशी अजब निविदा राबविण्याचा प्रकार उद्यान विभाग मार्फत झाला आहे त्यामुळे या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करून वृक्षारोपणाचे बिल ठेकेदारास देण्यात येऊ नये तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ठेकेदार तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आयुक्तांना निवेदन देऊन नितीन भुतारे यांनी केली आहे.
Post a Comment