डॉ. अण्णासाहेब डांगे यांना लोकराजा राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रधान


महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संस्थापक मार्गदर्शक, शिक्षण महर्षी डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांना लोकराजा राजश्री शाहू महाराज पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.


कोल्हापूर येथील अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन यांच्यावतीने फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. संतोष भोसले, प्रदेश महिला संघटक सुचिता कलाजे या मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, फेटा, बुके, मानपत्र, प्रमाणपत्र व लोकराजा राजश्री शाहू महाराज यांचे स्मृतिचिन्ह देऊन येथोचित गौरवण्यात आले.


डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांना आज अखेर उत्कृष्ट संसदपटू, शिक्षण रत्न, शिक्षण महर्षी, महाराष्ट्र भुषण, जीवन गौरव, पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची डॉक्टरेट, शिक्षण भुषण, इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँन्ड रिसर्च असोशिएशनचा इंडियन लीडरशिप अँवार्ड, जनस्थान यासह अनेक महत्वपूर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सहकार क्षेत्रात आदर्शवत अशी दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी कार्यक्षमपणे कार्यरत असुन संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हाजोरो विद्यार्थी तयार केले असून ते निरनिराळ्या क्षेत्रात ते चमकत आहेत. शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन आजही हाजारो कुटुंबीयांचे वर्तमान व भविष्य साकारले जात आहे. चौंडी ता. जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगांव चौंडी हे पर्यटनस्थळ निर्माण केले असुन त्यांना चौंडी विकासाचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात आले आहे.


मा. डॉ. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांनी आज अखेर संघ जीवन गाथा, कळलं का ?, समजलं का ?, नवरत्ने, गित अहिल्यायन व बिल्वदल, कुलस्वामीनी.

मायाक्कादेवी, सुभद्रा, माझे मत, रामलिंग, विविध, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, उमजलं का ?, रानमेवा, कोण अण्णा डांगे, पोवाड्यातील होळकर शाही यासह अन्य लेखन, होळकर शाहीच्या राज्यकर्त्यांच्या चित्रांचा अल्बम, चौंडी शिल्पसृष्टी अल्बम, अहिल्यादेवींचा पोवाडा व गीत अहिल्यायन संगीतबध्द करून कॅसेट व सी. डी. ची निर्मीती करून मराठी साहित्य क्षेत्रात अनमोल अशी भर घातली आहे. मा. डॉ. श्री. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांना अतिशय प्रतिष्ठीत मनाचा लोकराजा राजश्री शाहू महाराज राष्ट्रीय हा पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल केल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक राजकिय, सामाजिक, शैक्षणीक, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे तसेच समाज बांधव, कार्यकर्ते, राज्यातील निरनिराळ्या संघटना व राजकिय पक्षांच्या पदाधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडिया व दूरध्वनीवरून अभिनंदन केले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post