पंढरपुरची नियमित वारी केल्याने आध्यात्मिक आचारणात शिस्त-सातत्य निर्माण होते - मोगल महाराज
नगर - ‘विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ हे वारकर्यांचे ब्रिदवाक्य आजच्या काळात तंतोतंत अनुरुप आहे. टाळ, मृदंग, विणा, चिपळ्या ही वाद्ये वाजवित रामकृष्णहरीचा जय करीत आषाढीला जो पंढपुरची नियमित वारी करतो ही वारी केल्याने तुमच्या आध्यात्मिक आचारणात शिस्त-सातत्य निर्माण होते, असे विमोचन हभप मधुसूदन मोगल महाराज यांनी केले.
श्रीक्षेत्र शिऊर (ता.वैजापुर) येथील संतश्रेष्ठ बहिणाबाई पायी दिंडीचे पाईपलाईन रोडवरील यशोदानगरला मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी-पादुका डोक्यावर घेऊन कॉलनीत मिरवणुक काढण्यात आली. याप्रसंगी सोन्याबापू भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, जवाहर भुजबळ, ओंकार भुजबळ, अशोक भुजबळ, राजू भुजबळ, मधुकर भुजबळ, मयुरी भुजबळ, योगिता भुजबळ, निर्मला साबळे, भिमराव जाधव, भाऊ बिडे, हभप मोगल महाराज, हभप तुपे महाराज, माऊली गायकवाड, रमेश बिडवे, संदिप वाघमारे, संतोष जाधव, रघुनाथ औटी आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
हभप मधुसूदन मोगल महाराज यांच्या प्रेरणेने संत बहिणाबाई पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र शिऊर ते श्री क्षेत्र पंढरपुर पालखी रथासह वारकर्यांच्या अधिपत्याखाली संपन्न होतो. यच दिंंडीचे दरवर्षी यशोदानगर येथे भुजबळ परिवार व समस्त कॉलनीमधील रहिवासी स्वागत करुन सर्व वारकर्यांना दुपारचे भोजन देतात.
आज सकाळी एकविरा चौकात दिंडी येताच बॅण्ड पथक, फटाके, फुलांची उधळण करीत सर्व भाविक विठू नामाचा गजर करीत फुगड्यांचा खेळ करीत वारीत सहभागी झाले होते. बहिणाबाईंच्या पादुकांचे पूजन होऊन हभप मोगल महाराज यांनी किर्तन केले. किर्तनातून पांडूरंगाच्या भक्तीमुळे वारकर्यांचे जीवन किती सुखद, समाधानी होते यांची विमोचन केले.
किर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यचवेळी सकल नाभिक समाज, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, ओबीसी बारा बलुतेदार महासंघ, सर्व संघटना त्यांचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment