ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट नवी मुंबईच्या वतीने दरवर्षी निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविले जातात, यावेळी ट्रस्ट च्या वतीने जुईनगर सेक्टर २३ मध्यील शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यीनी यांना वह्या सह शालेय साहित्याचे वाटप ट्रस्ट च्या अध्यक्षा , समाजसेविका सौ. निताताई खोत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्री. राज खोत यांनी केले. संस्थापक अध्यक्षा सौ. निताताई खोत यांचा या नाविण्यपूर्ण उपक्रमाबद्दल सौ. सुजाता पाटील व उपस्थित महिला यांच्या यांच्या शुभहस्ते शाल व बुके देवून सत्कार करुन गौरविण्यात आले.
यावेळी नवी मुंबई जुईनगर येथील राकेश माने, विजय पाटील, रमेश पवार, प्रकाश चोरगे, उपस्थित होते शेवटी आभार मनोज बोराडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन कृष्णात खोत व ओम साई राम सेवाभावी ट्रस्ट नवी मुंबई च्या वतीने करण्यात येत असते.
Post a Comment