पोस्टल कर्मचाऱ्याच्या न्याय व प्रलंबित मागण्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील: महासचिव शिवाजी वसू रेड्डी

महाराष्ट्रतुन नागपूरचे धनंजय राऊत यांची यांची डेप्युटी जनरल सेक्रेटरीपदी निवड

अहमदनगर:  नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप सी चे सिल्वर ज्युबली अखिल भारतीय अधिवेशन श्रीक्षेत्र उज्जैन मध्यप्रदेश  येथे  दि 9 ते 11 जून 2024 दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
देशभरातील विविध राज्यातील  बाराशेपेक्षा तर महाराष्ट्रातील दिडशे सभासदांनी या अधिवेशनात सहभाग घेतला होता.अहमदनगर विभागातून टपाल कर्मचारी संघटनेचे  राज्याचे कार्याध्यक्ष संतोष यादव यांचेसह कमलेश मिरगणे,तान्हाजी सुर्यवंशी यांनी सहभाग नोंदविला.
अधिवेशनाचा शुभारंभ श्रीमती प्रिती अग्रवाल पोस्टमास्तर जनरल इंदोर रिजन यांचे शुभहस्ते करण्यात आले,यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनिल झुंजारराव, निसार मुजावर ,एन के त्यागी,डी किसनराव ,पी एस बाबू हे उपस्थित होते.
या मुख्य कार्यक्रमाचे प्रास्तविक शिवाजी वसू रेड्डी यांनी केले.
या तीन दिवसीय अधिवेशनात टपाल कर्मचाऱ्याचा विविध समस्या, स्टाफ शॉर्टज,कॅनेक्टिव्हिटीमध्ये वारंवार येत असलेल्या अडचणी, पेन्शन योजना या प्रमुख विषयासह विविध प्रश्नांवर  सविस्तरपणे चर्चा झाली.यावर देशभरातील अनेक सभासदांनी आपले मनोगत या अधिवेशनात व्यक्त करून यावर निर्णायक तोडगा काढण्याची विनंती केली.
पुढील दोन वर्षांकरिता रंजनकुमार तिवारी  (वेस्ट बंगाल) यांची अध्यक्षपदी ,श्री शिवाजी वसू रेड्डी (आंध्रप्रदेश) यांची जनरल सेक्रेटरी तर  महाराष्ट्राच्या वतीने धनंजय राऊत(नागपूर) यांची डेप्युटी जनरल सेक्रेटरीपदी,
मनोजकुमार कौशिक (नवी दिल्ली) यांचे फायनान्शिअल सेक्रेटरी निवड करण्यात आली.
     धनंजय राऊत हे महाराष्ट्राचे डेप्युटी सर्कल सेक्रेटरी तर नागपूर पोस्टल व टेलीग्राम सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून,त्याची देशपातळीवर डेप्युटी जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाल्याने त्याना राष्ट्रीय काम करण्याची संधी मिळाली आहे.
 त्याचे निवडीबदल त्याचा श्रीक्षेत्र उज्जैन येथे महाराष्ट्रातील सभासदाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना धनंजय राऊत यांनी सर्वाना धन्यवाद देत,आपण टाकलेल्या विश्वासास पात्र राहून,आपल्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी व खास करून जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करावी यासाठी खास आग्रही राहील,सभासद व प्रशासन यातील दुवा म्हणून निश्चितच प्रामाणिकपणे काम करील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्रातून     अधिवेशनासाठी उपस्थित असलेले श्री निसार मुजावर,श्री सुनील झुंजारराव,आर एच गुप्ता,संतोष कदम,संदिप सैदांनी (ठाणे) संतोष यादव,श्री कमलेश मिरगणे, तानाजी सूर्यवंशी (अहमदनगर)श्री शिवाजी नवले,श्री धनंजय शेंडगे (बीड),महादेव गोपाळघरे, रत्नाकर अभंग, कृष्णकांत तायडे सदा नाईक,धनंजय इंगोले (मुंबई) योगेश सामडोलीकर,आनंद गवळी  (कोल्हापूर) सूर्यकांत गुट्टे,संजय सनातन धाराशिव,,राजेंद्र विश्वास विश्वास, शंकर राख(श्रीरामपुर), श्री आशुतोष देशपांडे (नाशिक)मिलिंद निपाणकर (नागपूर) श्री गणेश ठाकूर,भालचंद्र चव्हाण(धुळे)नंदू झलबा, सुनील गोहर (गोवा)श्री महेंद्र कडु (पालघर)यांचे सह मोठया संख्येने सभासद उपस्थित होते. 



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post