वडिगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके व मा. नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरू केलेल्या ओ.बी.सी. आरक्षणास महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचा जाहीर पाठिंबा*
*प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे*
वडिगोद्री येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि मा.श्री. नवनाथ आबा वाघमारे हे गेली आठ दहा दिवस झाले ओ.बी.सी. आरक्षण बचाव साठी आमरण उपोषणास बसले असुन या उपोषणास महाराष्ट्र धनगर समाज महासंघाने जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी दिली.
आगामी काळात ओ.बी.सी. आरक्षणाच्या लढ्यात महाराष्ट्र धनगर समाज महासंघ ताकदीने उतरणार असल्याचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे सांगितले आहे.
Post a Comment