अहमदनगर: अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को ऑप क्रेडिट सोसायटीची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष नामदेव डेंगळे यांच्या अध्यक्षतेखाली राज पॅलेस कॉन्फरन्स हॉल याठिकाणी संपन्न झाली.
संस्थेचे कार्यकारी संचालक राधाकिसन मोटे पाटील यांनी सभेची नोटीस व आर्थिक पत्रके सभागृहापुढे ठेवली.
संस्थेचे सभासद संतोष यादव यांनी संस्थेच्या आर्थिकपत्रकाविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करत, संस्थेकडे आज अखेर कॅशक्रेडिट नसतानाही, संस्था उपलब्ध निधीमधून आपल्या सभासदास संस्थेच्या मंजूर उपविधिनुसार सर्वसाधारण कर्ज,अवघ्या नऊ टक्के व्याजदरात उपलब्ध करून देत असून, सातत्याने सभासदहितास प्राधान्य देत काम करत आहे. संस्थेच्या अवघ्या आठ वर्षेच्या कार्यकाळामध्ये कमीतकमी व्याजदरात स्वभाडवलातून अधिकाधिक कर्ज उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून आपला नावलौकिक निर्माण केला आहे.
ही बाब आपणा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत गौरवशाली बाब आहे.
याप्रसंगी रामभाऊ लांडगे, अमित देशमुख, वाय पी साळवे ,के एम कुमठेकर,एकनाथ ताकपेरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे चेअरमन नामदेव डेंगळे,संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संतोष यादव ,संदिप कोकाटे,अमित देशमुख,रामभाऊ लांडगे,वाय पी साळवे,के एम कुमठेकर,यांचे हस्ते सभासदाच्या पस्तीस गुणवंत पाल्याचा गौरव व सेवानिवृत्त सभासद श्रीमती वासंती नगरकर निलिमा कुलकर्णी यांचा तर संचालक म्हणून काम पाहिलेले संजय बोदर्डे,रावसाहेब चौधरी,प्रकाश कदम,श्रीमती जे पी गटणे,श्रीमती एच आर मगर, यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष नामदेव डेंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजवर आपण सर्वांनी जे सहकार्य केले त्यामुळे संस्था नेत्रदिपक प्रगती करू शकली,हे नमूद करत सर्वाना धन्यवाद देत,आजच्या सभेत घेतलेले सर्व निर्णयाची अंमलबजावणी संचालक मंडळ निश्चितच करील.
आपण सर्वांनी आजवर जे सहकार्य केले त्याबद्ल धन्यवाद देत,आगामी काळात असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी राधाकिसन मोटे,प्रकाश कदम ,प्रदिप सूर्यवंशी,तान्हाजी सूर्यवंशी, पी ए चौगुले,मोनाली कर्डिले,अश्विनी चिंतामणी, प्रितम वराडे अशोक बंडगर,अमोल साबळे,सचिन गायकवाड,कमलेश मिरगणे यांचेसह दिपक नागपुरे,दिपक कुंभारे,सुनिल थोरात,विजय चाबुकस्वार,विजय दंरदले,सविता ताकपेरे, निशा उदमले,प्रियांका भोपळे,वंदना नगरकर, सागर पंचारिया,आसिफ शेख,आबा उनवणे,सागर बोरुडे,लक्ष्मीकांत दंडवते ,धनंजय दैठणकर,संभाजी बसवेकर,यांच्यासह सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत गीत सौ वंदना नगरकर यांनी सादर केले.
प्रास्ताविक संतोष यादव सूत्रसंचालन तान्हाजी सूर्यवंशी तर आभार सचिन गायकवाड यांनी केले.
Post a Comment