संतोष यादव यांना राष्ट्रीय शिखर पुरस्कार जाहीर

 

अहमदनगर - नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे विभागीय सचिव संतोष यादव यांना ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा इंडियन पिनॅकल नॅशनल अवॉर्ड-२०२४ (राष्ट्रीय शिखर पुरस्कार ) अंतर्गत प्रशासनिक सेवा सहयोग पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संचालक प्रवीण साळवे, संचालिका सुप्रिया चौधरी यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण १२ मे रोजी पणजी (गोवा) येथे होणार आहे.
संतोष यादव हे केडगाव टपाल कार्यालयात पोस्टमास्तर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी टपाल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आवाज उठवून ते सोडवले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठीही ते तत्पर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन हे दिवाळी सणाला गरजू, निराधारांना फराळ, कपडे, महिलांना साड़ी वाटप करते, दुर्गम भागातील शाळांसाठी प्रयोगशाळेला, व्यायामाचे साहित्य, तर गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post