धनगर समाज सेवा संघाचा रविवारी राज्यस्तरीय वधू-वर मेळावा

 
     नगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज सेवा संघाच्यावतीने रविवार दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी गंगा लॉन, निर्मलनगर, सावेडी, अहमदनगर येथे भव्य राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र तागड यांनी दिली.

     या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्य मंत्री ना.भागवत कराड, इंदोर संस्थानचे भुषणसिंह राजे होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नववे वंशज माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे, खा.डॉ.सुजय विखे, आ.निलेश लंके, आ.संग्राम जगताप युवा कीर्तनकार ह . भ.प शिवप्रसाद महाराज पंडित, व्याख्याते किसन आटोळे.आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्योजक अक्षय वाघमोडे, सचिन सोडणार, गोकूळ हांडे, उत्तर सरगर, अशोक देवकाते, रामदास भडांगे आदि मान्यवरांस समाजातील राज्य पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

     या मेळाव्यात सर्व शाखीय, शिक्षित, उच्च शिक्षित, व्यवसायिक, उद्योजक,  नोकरदार वधू-वर सहभागी झाले आहेत. वधू-वर पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात येणार असून, सहभागी वधू-वरांना ही  पुस्तिका देण्यात येणार आहे.

     हा वधू-वर मेळावा यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेंद्र तागड, सुर्यकांत तागड, सोपानराव राहिंज, वसंतराव दातीर, हरिश्चंद्र करडे आदिंसह पदाधिकारी कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी 9422783132 या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

----------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post