कामगारांच्या निरनिराळ्या प्रलंबित प्रश्नांबाबत रयत क्रांती संघटनेच्या वतीने कामगार आयुक्त यांना निवेदन :प्रदेशाध्यक्ष, जितेंद्रभाऊ सुर्यवंशी

 
इस्लामपूर (वार्ताहर) कामगारांच्या प्रलंबीत निरनिराळ्या प्रश्नांबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, विश्रामबाग, सांगली येथे कामगार आयुक्त मा. मुजावरसाहेब यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन सादर करण्यात आले. गेल्या सात आठ महिण्यांपासुन नविन कामगारांची नोंदणी अर्ज पेंडींग असुन याबाबत लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी, यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारा करण्यात आल्या असल्याची माहीती रयत क्रांती कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, कामगार नेते  जितेंद्रभाऊ सुर्यवंशी यांनी दिली.

सांगलीचे कामगार आयुक्त . मुजावरसाहेब यांनी या मागण्याबाबात सकारात्मक भुमिका घेतली असुन नोंदणी लाभार्थी व नुतनीकरणाचे सर्व अर्ज तात्काळ मंजूर होतील असे आश्वासन यावेळी दिले.  यावेळी सौ. वंदनाताई कांबळे,भानुदास कारंडे, सुजल कदम, सुभाष पवार, राजेंद्र कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना कामगार नेते जितेंद्र सुर्यवंशी म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री मा. आमदार . सदाभाऊ खोत व रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष, युवक नेते . सागरभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य भर कामगार यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहणार आहोत. 

सदरच्या मागण्यांच्या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  ना. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री  ना. सुरेश खाडे, महाराष्ट्राचे माजी कृषी व पाणी पुरवठा मंत्री, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, मार्गदर्शक माजी आमदार . सदाभाऊ खोत यांनी पाठिण्यात आल्या असल्याची माहीतीही कामगार नेते जितेंद्र सुर्यवंशी यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post