डाक विभागाच्या विविध योजना लोकाभिमुख होणे करिता अधिकाधिक प्रयत्न होणे गरजेचे ...श्री बी नंदा
●केडगाव पोस्ट ऑफिस द्वारा महिला सन्मान बचतपत्र योजनेत विशेष योगदान
केडगाव: अहमदनगर डाक विभागामध्ये दि 1 एप्रिल 23 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत पोस्टऑफिसच्या विविध योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या डाक कर्मचारी यांचा कौतुक सोहळा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पासपोर्ट हॉल अहमदनगर येथे मा श्री बी नंदा प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी बोलताना श्री बी नंदा यांनी पोस्ट विभागाच्या योजना जनसामान्यांना पर्यत पोहचविण्यासाठी डाक कर्मचारी व ग्रामीण भागात कार्यरत असणारे ग्रामीण डाकसेवकांचे मोलाचे योगदान असून,सरकारच्या विविध योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात,त्याच्याच माध्यमातून अल्पबचतीच्या विविध योजनेची नवीन खाते उघडण्याच्या मोहीमेत मोठे काम होत आहे.
आजच्या कौतुक सोहळ्यात आपण विभागीय कर्मचारी यांचे सह ग्रामीण डाक सेवकांना आपण सन्मानित करत आहोत ही मोठी गौरवशाली बाब असून,आगामी कालखंडात गौरवित कर्मचाऱ्यांसह, सर्व कर्मचारी यांनी आर्थिक वर्षातील उर्वरित कालावधीत विभागाच्या विविध योजनेचा प्रचार प्रसार करून अधिकाधिक ग्राहक जोडावेत, आपल्या या सकारात्मक सहभागामुळे अहमदनगर विभाग राज्यात अग्रेसर ठेवतील असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
याप्रसंगी पुरस्कारप्राप्ती महेश तामटे, पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव,आसिफ पठाण,अंबादास फुंदे, घनश्याम साहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
केडगाव पोस्टऑफिसच्या सौ शुभांगी मांडगे यांनी पोस्टल लाईफ इन्शुरन्स मध्ये तर अकोळनेर शाखा डाकघराचे श्री बाळासाहेब सोनवणे,भोरवाडीचे श्री रमेश घुले यांना सन्मानित करण्यात आले.
यांचे सह विभागातील पुरस्कार प्राप्ती सौ तृप्ती जोशी,किशोर नेमाने श्रीमती प्रमिला कासार,संजय कदम,अमोल साबळे,नितीन खेडकर,जाकीर शेख,महेश सदाफुले,श्रीमती आर ए पडळकर, संजय बोदर्डे,अनिल मरकड ,प्रवीण कोल्हे,अनिल लोटके,अंबादास फुंदे,पोस्टल लाईफ इन्शुरन्स अभिकर्ते सौ निताताई ढाकणे,सौ मंजुषा खरात,श्री मांडगे राजकुमार यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बनकर,प्रास्ताविक श्री संदिप हदगल,तर आभार प्रदर्शन श्री संजय बोदर्डे यांनी केले.
या कार्यक्रमास विभागातील सर्व पुरस्कार प्राप्ती कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदिप सूर्यवंशी,संतोष घुले, तान्हाजी सूर्यवंशी,सागर पंचारिया,सुनिल भागवत, प्रफुल्ल काळे,ऋषीकेश कार्ले, सागर पंचारिया यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------
कोट:
एप्रिल 23 ते जानेवारी 24 या कालावधीत नवीन अकाउंट ओपनिंग मध्ये उल्लेखनीय काम केल्याबदल डाक विभागाच्या वतीने गौरवीत करण्यात आले यांचा विशेष आनंद आहे.यापुढील कालावधीत पोस्टाच्या सर्व योजना लोकाभिमुख करण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहू.
संतोष यादव
पोस्टमास्तर
केडगाव (अहमदनगर आर एस)
Post a Comment