नगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज सेवा संघाच्यावतीने फेबु्रवारी महिन्यात भव्य राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे नगरमध्ये आयोजन करण्यात आले असून, या वधू-वर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पालकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन अध्यक्ष राजेंद्र तागड यांनी केले आहे.
या मेळाव्यात सर्व शाखीय, शिक्षित, उच्च शिक्षित, व्यवसायिक, उद्योजक, नोकरदार वधू-वर सहभागी होऊ शकतात. अधिकाधिक नावाची नोंदणी व्हावी, यासाठी आपल्या व आप्तजनांच्या पाल्यांची माहिती पाठवावी. तसेच वधू-वर पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात येणार असून, सहभागी वधू-वरांना ही पुस्तिका देण्यात येणार आहे.
हा वधू-वर मेळावा यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेंद्र तागड, सुर्यकांत तागड, सोपानराव राहिंज, वसंतराव दातीर, हरिश्चंद्र करडे आदिंसह पदाधिकारी कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी 9422783132 या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------
Post a Comment