(1)धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंत निवासी शिक्षण मोफत असून सदर योजना नाशिक, जळगाव,नगर येथे सुरू आहेत उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार मध्ये का सुरू करण्यात आले नाही याबद्दल अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यांनी सविस्तर आकडेवारी सह माहिती दिली, लवकरच धुळे व नंदुरबार येथे सुद्धा शाळा सुरुवात करण्यात येईल असे सांगितले,
नाशिक जिल्हा 2 शाळा 300 विद्यार्थी
जळगाव 2 दोन शाळा 550 विद्यार्थी
अहमदनगर 4 शाळा 400 विद्यार्थी
धुळे 00 विद्यार्थी
नंदुरबार 00 विद्यार्थी एकूण 1250 विद्यार्थी सध्या लाभ घेत आहेत
(2)घरकुल योजना विषयी समाज बांधवांमध्ये संभ्रम असल्यामुळे त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली धनगर समाजासाठी घरकुल योजना स्वतंत्र असून सदर अर्ज ग्रामपंचायत मार्फत सामाजिक कल्याण विभागात पाठवण्याचे आव्हान त्यांनी केले व समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले
(3) बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वस्तीगृहात नंबर लागले नसतील त्याना रोखीने अनुदान आहे जिल्ह्यातील सामाजिक कल्याण विभागात जाऊन सविस्तर चौकशी करून अर्ज सादर करावेत त्यांनी या योजनेचा जरूर फायदा घ्यावा काही अडचण असली तर कार्यालयाशी संपर्क साधावा.
(4) 100 मुला मुलींचे निवासी वस्तीगृहासाठी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन त्यांनी केले, सुभेदार मल्हार होळकर असे नामांकन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली, तसं प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(5) महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत दहा लाखापासून ते एक कोटी पर्यंत कर्ज मिळू शकते या योजनेचा ही वैयक्तिक महिलांना फायदा होऊ शकतो होतकरू महिलांनी पुढे येऊन प्रस्ताव सादर करावेत असे त्यांनी सांगितले,
अशा अनेक योजनांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली अनेक समाज बांधवांनी समोरासमोर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले अधिकाऱ्यांनाही समाधानकारक उत्तर दिले, *स्कॉलरशिप संदर्भात उत्तर महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयाशी समर्क करून लवकरच कार्यशाळा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले* काही अडचण किंवा तक्रारी असल्यास कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन केले,
काही योजना पशु व दुग्ध विभागाशी संबंधित असल्यामुळे त्यांची देखील स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.
सदर बैठकीची प्रस्तावना धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी यांनी केले सदर बैठकीस उत्तर महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व समाजसेवक यांचा सह खालील मान्यवर उपस्थित होते.
डाँ.विकास महात्मे, मा.खासदार, ज्ञानेश्वरभाऊ परदेशी,
विठ्ठलभाऊ मारनर, बापूसाहेब शिंदे,
सचिन मार्तंड,
नवनाथ शिंदे,
योगेश पानसरे,
बंडू कुवर,
वाल्मीक खांडेकर,
भाऊसाहेब ओहळ,
ड्रा तुषार चिंचोरे,
समाधान बागल,
नविनीत वजीरे,
सुदाम आण्णा लोंढे,
नाना मोगरे,
देवचन्द साबळे,
बाबुराव हिगे,
आबासाहेब टरपले,
दिपक सुडके,
हेमंत शिंदे,
प्रजल पानसरे,
योगेश सरोद,
दुकले बाबुराव,
विलास बिडगर,
प्रल्हाद केसकर,
रुपेश भाऊ शिंदे,
अरुण भाऊ गिरजे,
मनोहर परदेशी,
ठेंगे साहेब,
किरण थोरात,
योगेश सरोदे, यांचा सह उत्तर महाराष्ट्रातील विविध संघटना पदाधिकारी, समाज सेवक, समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment