धनगर आरक्षणप्रश्नी यशवंत सेनेचे चौंडी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरु




धनगर आरक्षणाचा वटहुकुम निघाल्या शिवाय उठणार नाहीत - बाळासाहेब दोडतले      

जामखेड प्रतिनिधी

धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची पन्नास दिवसात अमलबजावणी करण्याच्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्याने यशवंत सेनेने चौंडी (ता.जामखेड) येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.           

यासंदर्भात यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगीतले,की धनगर समाजाच्या अनूसुचित जमाती आरक्षणाची अमलबजावणीच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे सप्टेबरमध्ये एकवीस दिवसाचे आमरण उपोषण झाले. त्यावेळी राज्यशासनाने यशवंत सेनेला 50 दिवसात आरक्षण अमलबजावणी करण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र प्रत्यक्षात संपलेल्या पन्नास दिवसात आरक्षण अमलबजावणी संदर्भात राज्यशासनाने काहीच निर्णय घेतला नाही. 

उपोषाणकर्त्याबरोबर बैठक घ्यायची, चर्चा करायची, परंतु कृती काहीच करायची नाही, असा लबाडीचा खेळ राज्यसरकारकडून सुरु असल्याचा आरोप दोडतले यांनी केला. त्यामुळे यशवंत सेनेने पुन्हा एकदा आमरण ऊपोषणाचा मार्ग निवडला आहे. यावेळी स्वतः बाळासाहेब दोडतले, मागील उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर, सुरेश बंडगर आमरण उपोषणास बसले असून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.   

यावेळी यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील म्हणाले, 50 दिवसात आरक्षण अमलबजावणी करण्यासाठी शासन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली  आयोग नेमून केंद्र सरकारला शिफारश करुव दोन महीन्यात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन आरक्षणाची अमलबजावणी करण्याचे तसेच चार राज्यांचा आरक्षण अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमण्याची व राज्यातच शासननिर्णय काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र यातील काहीही झाले नाही.एकूणच राज्यसरकार धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष मानिकराव दांगडे पाटील प्रा. आण्णासाहेब रुपनवर, नितीन धायगुडे, किरण धालपे, बाळा गायके, दत्ता काळे, स्वप्निल मेमाणे, अक्षय शिंदे, कृष्णा बोबडे, आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post