नगर - देशात गाव-खेड्यापासून तर जिल्हास्तरावर माजी सैनिकांच्या विविध संघटना सामाजिक कामे करत आहेत. या देशभरातील माजी सैनिक संघटनांच्या प्रतिनिधींचा भव्य मेळावा रविवारी 19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.45 वाजता राळेगणसिद्धी, ता.पारनेर, जि.अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. यासर्व माजी सैनिकांच्या प्रतिनिधित्व करणार्या माजी सैनिकांना जेष्ठ समाजसेवक तथा निवृत्त माजी सैनिक आण्णासाहेब हजारे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात मातृभुमीच्या हितासाठी शेतकर्यांना शेतकर्यांच्या मालाला हमी भाव, सैनिकांसाठी ओआरओपी च्या विसंगती दूर करण्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त देश बनविण्यासाठी, मजबूत लोकपाल आयुक्तांची नेमणुक करण्यासाठी, युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्याला न्याय मिळूवन देण्याकरिता तसेच विद्यार्थी व पालकांवरील शिक्षणाचा आर्थिक भार कमी करण्याबाबत चर्चा होणार आहे.
या मेळाव्याला राज्यातील सर्व संघटनेचे सचिव व अध्यक्ष व इतर सैनिक प्रतिनिधी, वीरनारी, वीरमाता तसेच राज्याचे शेतकरी नेते उपस्थित राहणार असल्याचे नारायण अंकुशे, कॅप्टन विठ्ठलराव वराळ, बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, दादासाहेब पठारे यांनी सांगितले. तरी या मेळाव्यास माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो.8485869747 व 9623575495 या क्रमांकावर संपर्क साधावा.
--------
कृपया प्रसिद्धीसाठी नारायण अंकुशे (मो..8485869747)
Post a Comment