●टपाल कर्मचारी संघटनेचा उपक्रम
अहमदनगर : श्रीक्षेत्र चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवचे औचित्य साधत, भारतीय डाक विभागाच्या माय स्टाफ योजनेअंतर्गत पोस्टल स्टॅम्पचा संच आमदार राम शिंदे यांना उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख,पोस्टल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष यादव , सागर कलगुंडे, संदिप कोकाटे,. पांडुरंग माने , महेश मासाळ यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
चोंडी येथे संपन्न झालेले भव्य मुख्य कार्यक्रमानंतर राम शिंदे यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राम शिंदे यांचे राजकीय सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अतिशय अनमोल व महत्त्वपूर्ण असून या बाबीचे कौतुक म्हणून भारतीय डाक विभाग,पोस्टल संघटना,व सहयाद्री प्रतिष्ठान यांचे वतीने माय स्टॅम्प मा श्री राम शिंदे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना अमित देशमुख यांनी मायस्टॅम्प या योजनेसह पोस्टाच्या विविध योजनेची सविस्तरपणे माहिती विषद केली,उपस्थिती सर्वानी डाक विभागाच्या या योजनेचे विशेष कौतुक केले.
राम शिंदे यांनी बोलताना मायस्टॅम्प या योजनेचे विषय कौतुक करत, सागर कलगुंडे,व महेश मासाळ यांच्या सह नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगर यांना विशेष धन्यवाद दिले.
यावेळी अशोक बंडगर, दिपक काळे,रावसाहेब चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदिप कोकाटे, प्रास्ताविक अमित देशमुख, सूत्रसंचालन संतोष यादव तर आभार दिपक काळे यांनी मानले.
अहमदनगर जिल्ह्यातील दिलीप गांध ( माजी केंद्रीय मंत्री), पद्मश्री, पद्मभूषण .आण्णा हजारे व निलेश लंके(आमदार पारनेर) यांना याअगोदर पोस्टल माय स्टॅम्प देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
Post a Comment