घबकवाडी ता. वाळवा येथील प्रगतशील शेतकरी व वहान मालक श्री. सयाजीराव पांडूरंग खोत यांचे चिरंजीव कु. किरण सयाजीराव खोत याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (MSF) मध्ये निवड झाल्याबद्दल घबकवाडी गांवच्या लोकनियुक्त सरपंच मा. संगीता माणिकराव घबक (वहिनी) व गावचे माजी आदर्श सरपंच श्री संजय कदम (बापू) यांच्या शुभहस्ते शाल, फेटा, श्रीफळ, बुके व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी घबकवाडी गावचे माजी उपसरपंच श्री. युवराज भारती, श्री. बजरंग कदम (आण्णा), ग्रामपंचायत सदस्या सौ. वंदना दिपकराव खोत, बबनराव खोत, फौजी विनोद कदम, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुनिल भारती, दिपकराव खोत, सयाजीराव खोत, दिनकराव कदम, युवा नेते अमितराव
घबक, हंबीरराव कदम, दादासो शिंदे, राहूल मुळीक, दत्तात्रय डंगारणे, अजित कदम, बाबासो भारती, संतोष कदम, दिलिप कुंभार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
स्वागत व प्रास्ताविक बजरंग कदम यांनी केले, गांवचे माजी आदर्श सरपंच श्री संजय कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन बबनराव घबक व अजित कदम यांनी केले तर शेवटी आभार दिपकराव खोत यांनी मानले.
Post a Comment