भातोडी मध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव

 



भातोडी: येथील 'नृसिंह मंदिर सभागृह' मध्ये भातोडी पंचक्रोशीतील  'सकल हिंदू समाज' च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी आरती करण्यात आली.सरपंच श्री. विक्रम लबडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नृसिंह मंदिर पुजारी श्री. रमेश भोपे यांनी पुष्पहार अर्पण करून मंत्रोच्चार केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. कैलास गांगर्डे यांनी प्रास्ताविक केले.

ग्रामपंचायत सदस्य श्री. जालिंदर लबडे, ग्रा. पं. सदस्य श्री. विक्रम गायकवाड, युवा नेते श्री.अशोक कदम, उद्योजक श्री. अशोक धलपे, मेजर श्री. कृष्णा भोपे, मेजर श्री. ललित लबडे, माजी सैनिक श्री. ज्ञानेश्वर काळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक तरटे, श्री. ऋषिकेश शिंदे, श्री. रोहन भोपे, श्री. नितीन चौरे, श्री. अभिमान लबडे,  श्री. संजय टाक, श्री.बापू पोटे या सर्व मान्यवर हिंदू बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाज संघटीत व एकोपा ठेवण्याचे आवाहन केले. 
शिव व्याख्याते पत्रकार श्री. आदिनाथ शिंदे यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राचा आढावा घेताना स्वधर्म निष्ठा व प्रयत्नांची पराकाष्ठा हे गुण घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. ज्या प्रमाणे संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी बलिदान दिले पण बेईमानी केली नाही. त्याचप्रमाणे तरुणांनी विचार जीवनात अमलांत आणण्याचे आवाहन केले. 
सरपंच श्री. विक्रम लबडे यांनी संभाजी महाराजांच्या चरित्रातून आपण स्वाभिमान, धर्माभिमान व संस्कृती ची जपणूक करण्याची शिकवण घेणे गरजेचे आहे. समाज जीवन बदलत असतांना एकता ठेवून पुढे जाणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. तसेच आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 
युवा कार्यकर्ते श्री. विलास लबडे यांचे बहारदार सूत्रसंचालन कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ठरले. अल्पोपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवभक्त श्री. बंडु गायकवाड, शिवभक्त श्री. घनश्याम राऊत, शिवभक्त श्री. श्याम लबडे, शिवभक्त श्री. अजिंक्य कचरे ,शिवभक्त श्री.सोनू कदम पा. आदींनी परिश्रम घेतले. यावेळी श्री.रमेश देवा, श्री.अशोक लबडे आणि मोठ्या संख्येने शिवशंभू भक्त उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post