पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हा.- पांडुरंग माने




राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. कुशल प्रशासक व आदर्श न्याय पद्धतीच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्याचा खऱ्या अर्थाने राम आणला. जवा हिंदुस्तान परकिय राजवटीमुळे शंत खंडित झाला होता. त्यास अखंडित ठेवण्याचा काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली व शेकडो मंदिरे जनार्धन  जीनौद्रधार केला व हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला.
  अशा या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड ता. चोंडी हे आहे.महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची चोंडी येथे जयंती दर वर्षी मोठया उत्साहात होती. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानला नवी दिशा दिली. देशाला अखंडित ठेवले. त्यांच्या महान स्मृती पुढे नतमस्तक होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती यावेळी देखील मोठया संख्येने उत्साहात साजरी करूया.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post