प्रिटींग व्यावसायिकावरील हल्ल्याचा असोसिएशनच्यावतीने निषेध

 

प्रिटींग व्यावसायिकावरील हल्ल्याचा असोसिएशनच्यावतीने निषेध

दि अहमदनगर प्रेस अ‍ॅण्ड अलाईड ओनर्स असो.चे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

     नगर - प्रिटींग मटेरियल व्यावसायिक श्री.सर्वेश बार्शीकर व स्वरुप बार्शीकर यांच्यावर किरकोळ कारणातून झालेल्या हल्ल्याचा दि अहमदनगर प्रेस अ‍ॅण्ड अलाईड ओनर्स असोसिएशच्यावतीने निषेध करुन पोलिस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष संदिप भगत, संजय बाले, सचिन ठुबे, पंकज जाधव, नितीन धुमाळ, समिर कुलकर्णी आदि उपस्थित होते.

     जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींच्या गुंडांची दहशत वाढली आहे. जाणून-बुजून व्यावसायिकांना त्रास देण्याचे प्रकार होत आहेत. प्राणघातक हल्ल्याच्या हेतूने शस्त्रांचा वापर होत आहे. शहरातील समस्त व्यापारी बांधव गुंडांच्या दहशतीमुळे भयभीत झालेला आहे. तरी आपण सदर प्रकरणात लक्ष घालून सर्व आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व व्यापारी सर्वेश बार्शीकर व स्वरुप बार्शीकर यांना न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

     तसेच असोसिएशनच्यावतीने पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुद्रक व्यवसायिक  निलेश शाह, पोपट शेळके, नंदेश शिंदे, दिपक अमृते, संदिप ठुबे, बाळासाहेब पवार, विश्वास खिलारी, बाळासाहेब पवार, राजेंद्र नजन, दादासाहेब विधाते, गणेश दराडे, स्वप्नील गुंदेचा, सुदर्शन बोगा, अभय मुथा, सुखदेव सुंबे, मनिष झंवर, मुकुंंद दळवी, मनोज बनकर, किशोर खुबचंदानी, गोरख बिने, विजय दांडगे, जगन्नाथ दळवी, शिरीन शेख, प्रमोद गायकवाड, गणेश न्यालपेल्ली, श्रीनिवास तौटी आदिंच्या निवेदनावर सह्या आहेत.

--------

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post