नगर - अहमदनगर प्रेस क्लबच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘बेस्ट रिपोर्टर पुरस्कार’ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते निशांत दातीर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, राष्ट्रपती पुरस्कर विजेते डॉ.अमोल बागुल आदि मान्यवर उपस्थित होते.
निशांत दातीर यांना यापुर्वी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, नंदा फौंडेशन मुंबई, शब्दगंध साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, इंदिरा प्रतिष्ठान असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
निशांत दातीर तब्बल 22 वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये लिखिन करत आहेत. निशांत दिवाळी अंक, साप्ताहिक संत नगर टाइम्स, साप्ताहिक लोकअंकुर ची संपादक पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे.
या पुरस्कारबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment