सावित्रीबाई फुले विषयावर राज्यस्तरीय काव्यस्पर्धा

 


      नगर- महाराष्ट्रभर साजरा होणाऱ्या सावित्री उत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले या विषयावर राज्यस्तरीय काव्यस्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती स्वागताध्यक्ष अनिल जावळे, 'विचारधारा'चे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले व स्पर्धाप्रमुख कवयित्री सुरेखा घोलप यांनी दिली.
        'जिज्ञासा अकादमी', 'विचारधारा' व विविध संस्था संघटनांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून नववर्षातील पहिला सण म्हणून 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करीत आहोत. 'सावित्री उत्सव' हा देशाचा महोत्सव व्हावा यासाठी  देशभरातील कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या अहमदनगर शहरात सावित्रीबाई फुले शिकल्या त्या अहमदनगर शहरात 'सावित्री उत्सव' मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने यावर्षीही राज्यस्तरीय काव्य स्पर्धा घेण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त कवींनी कवयित्रींनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
स्पर्धचे नियम
१) स्पर्धेचा विषय - 'सावित्रीबाई फुले' असा आहे. २) केवळ " सावित्रीबाई फुले" यांचे जीवन व कार्य या अनुषंगाने लिहिलेली कविता स्पर्धेत स्वीकारली जाईल.
३) कविता गद्य-पद्य अशा कोणत्याही आविष्कार प्रकारात चालेल, परंतु ती आटोपशीर असावी.
४) स्पर्धेत राज्यातील, देशातील व परदेशातील मराठी प्रतिभावान स्पर्धकांच्या सहभागाचे स्वागत आहे.
५) स्पर्धकांना 'सावित्रीबाई फुले' या विषयावर जास्तीतजास्त दोन स्वरचित कविता पाठवता येतील आणि ती टाईप करून jidnyasa.academy@gmail.com या मेल आयडीवर किंवा
+918805090159 या नंबरवर पाठवावी. ६) कविता स्वरचित असल्याचे पत्र देणे बंधनकारक आहे. ७) आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर (व्हाटसअप वर ) पाठवावा.
८) पहिल्या तीन विजेत्याना रोख रक्कम व 'सावित्री उत्सव काव्यपुरस्कार'  देऊन गौरविले जाईल.
      (बक्षीस रक्कम पहिले ₹२०००/-, दुसरे ₹१५००/- व तिसरे ₹१०००/- रुपये)
९) दि. २५ डिसेंबर २०२२ नंतर येणाऱ्या कवितांचा विचार केला जाणार नाही.
(१०) कवितेमध्ये इमोजींचा वापर करू नये. (११) पहिल्या तीन विजेत्याना रोख रक्कम व 'सावित्री उत्सव काव्यपुरस्कार'  देऊन गौरविले जाईल. (बक्षीस रक्कम पहिले ₹२०००/-, दुसरे ₹१५००/- व तिसरे ₹१०००/- रुपये) ११) विजेत्या स्पर्धकांच्या कविता 'सावित्री वदते...' या विशेषांकात प्रकाशित केल्या जातील. १२) स्पर्धेचा निकाल १५ जानेवारी २०२३ रोजी जाहीर केला जाणार
१३) स्पर्धेमध्ये, कार्यक्रमाचे आयोजन नियोजनात बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राहतील.
१४)स्पर्धा कालावधीत इतर कोणतेही मेसेज पाठवू नये. १५)परीक्षकांचा निकाल निर्णय अंतिम राहील.
१६) परीक्षकांची नावे व परिचय निकाल जाहीर केला जाईल तेव्हा सांगण्यात येतील.
       तरी या काव्यस्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन निमंत्रक प्रा. संगिताताई गाडेकर, श्रीकांत वंगारी, प्रकाश कोटा, नंदाताई माडगे, कल्पना बुलबुले, त्रिशाली कोटा व राजेंद्र बुलबुले यांनी केले.
 
 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post