पक्ष गट तट न मानता गावच्या विकास कामांना आगामी काळात टप्या टप्याने गती देणार, गावच्या विकास कामात कसलेही राजकारण येणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेणार असल्याची माहिती घबकवाडी च्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच संगीता माणीकराव घबक यांनी दिली. गावातील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक संपली आता कोणासही कसलाही दूजाभाव न देता. गावातील प्रत्येक नागरीकांशी संवाद साधणार असुन दर महिन्याला ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतमध्ये
जनता दरबार भरावणार असुन या जनता दरबारात ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेवून त्या शासन दरबारी सोडविण्यासाठी पूर्ण वेळ काम करणार आहे. महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या निरनिराळ्या व वैयक्तीक लाभाच्या योजना तळागाळा पर्यत पोहोचविणार आहे.
घबकवाडी, खोतवाडी, शिंदेवाडी, मठवस्ती ह्या चार विभागात ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र विभागलेले आहे. यामुळे सर्व विभागातील पानंद रस्ते मुख्य रस्ते, नाली, अंतर्गत कॉक्रेटीकरण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीरे, शालेय विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, खोतवाडीच्या पश्चिम बाजूने म्हातारा डोंगराकडे जाणारा पानंद रस्ता करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. मठ वस्ती मध्ये सुसज्ज सांस्कृतीक भवन उभारणे येथील दफन भूमिचा जिर्णोद्वार व सुशोभिकरण करणे तसेच तिळगंगा नदी (ओढ्या) लगत घाट बांधणे व रहदारीसाठी साकव बांधणे हि विकासात्मक कामे प्राधान्याने हाती घेणार आहे. गावातील स्मशानभूमिकडे जाणाऱ्या ३३ फुटी साखळी रस्त्यावरील अतिक्रमणे पूर्णपणे काढून उरवरीत काम पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. ग्रामपंचायत इमारत, शाळा खोल्यांची देखभाल दुरुस्ती व सर्व विभागात हायमास्ट दिवे, सौर दिवे बसविणे आवश्यक आहे. व्यायामशाळा, जिम उभारणे, युवकांना रोजगार व उद्योग धंद्यासाठी निरनिराळ्या महामंडळाकडून मदत मिळवून देणे, सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून गावामधील चौका मध्ये सी. सी. टी.व्ही. बसविणे हि आवश्यक आहे. अशा स्वरूपाची कामे हि आगामी काळात पूर्णत्वास नेहण्यासाठी अहोरात्र प्रयत्नांची पराकष्ठा करणार असल्याचेही गांवच्या लोकनियुक्त सरपंच संगीता माणीकराव घबक यांनी सांगीतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बजरंग कदम, माजी उपसरपंच महादेव खोत (काका), समन्वय समिती प्रमुख दिपकराव खोत, गांवचे माजी उपसरपंच युवराज भारती, ग्रामपंचायत सदस्य सौ. वंदना दिपकराव खोत, सुनिल भारती, शंकरराव कदम(नाना), सयाजीराव खोत, बाबासो भारती, अमित कदम, कृष्णात खोत, हंबीरराव कदम, आनंदराव कदम, अजित कदम, राहूल मुळीक, दत्तात्रय डंगारणे, प्रताप कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कुंभार, रविंद्र भारती, जालिंदर कदम, सुरेश कदम, संतोष कदम, प्रशांत कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरीक मोठ्यआ संख्येने उपस्थित होते
Post a Comment