भटके विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटिबद्ध - बावनकुळे





नागपुरात भटक्या विमुक्तांचे राज्यव्यापी पहिलेच अधिवेशन, भटक्यांच्या प्रश्नांवर सर्वांगीन चर्चा

नागपूर (विशेष प्रतिनिधी) :  भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन नागपुर येथे पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय घुमनतू आयोगाचे माजी अध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते , आघाडीचे प्रदेशाध्यक्ष  माजी आमदार नरेंद्र पवार व प्रदेश प्रभारी श्री संजय केनेकर यांनी केले. 

अधिवेशनाचा समारोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केला. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, भटके विमुक्तांनी आता काळजी करण्याची गरज नाही. शिंदे- फडणवीस सरकार हे भटक्या-विमुक्तांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे.  अधिवेशनात ठरावाच्या स्वरूपात ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत एक बैठक घेण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या सर्व मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी पालक म्हणून आपण घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भटक्या समाजातील सर्व घटकांना पक्ष स्तरावर व निवडणुकीमध्ये न्याय देण्याचे काम भाजप करेल,  कोणावरही अन्याय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी  भटके विमुक्त आघाडीने भव्य असे पहिले राज्यव्यापी अधिवेशन भरवून ते यशस्वी केल्यांने त्यांनी भटक्या विमुक्त आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले. तसेच शासकीय समित्यांवर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचे आश्वासनही त्यांनी यानिमित्ताने दिले.

 अधिवेशनासाठी प्रदेश महामंत्री संजय केनेकर, आघाडीचे प्रदेशध्यक्ष नरेंद्र पवार, माजी खासदार विकास महात्मे, इदाते आयोगाचे माजी अध्यक्ष दादा  इदाते, आमदार गोपीचंद पडळकर,  विश्वास पाठक, भटके मुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अशोक चोरमले, प्रवक्ते गणेश हाके,  विनोद वाघ, मा. आ. विजयराज शिंदे, भटके विमुक्त आघाडीचे माजी प्रदेश अध्यक्ष योगेश बनसह   आ.विजयराय शिंदे. डॉ.समिरा भारती.डॉ.उज्जवला  दहिफळे. कडनर कोंडाजी.मुकेश काकड.प्रदेश उपाध्यक्ष.श्रीराम मुंडे प्रदेश सचिव.रवि शिंदे.राजु जाधव.किशोर सहगण  आघाडीचे सर्व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. 


            यावेळी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी भटके विमुक्तांचे पारंपरिक उद्योग- व्यवसाय, पारंपरिक लोककलेला वाव देण्यासाठी ही आघाडी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.  तसेच त्यांच्या विविध प्रश्नासाठी भटके विमुक्त आघाडी प्रयत्नशील असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  आवश्यक तिथे संघर्ष करू परंतु भटक्या समाजाला न्याय देण्याचं काम आपण सर्व मिळून करू असे आवाहन पवार यांनी  यावेळी केले.


            काँग्रेस- राष्ट्रवादीमुळे भटके विमुक्त समाज मागे राहिला आहे. आता भटके विमुक्तांचे सरकार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. हिंदुत्वाच्या पोशाख घालून काही राजकीय मंडळी भटके विमुक्तांना विचलित करू पाहत आहेत असे प्रदेश महामंत्री संजय केनेकर यांनी यावेळी सांगितले. अधिवेशना त श्री भिकुजी दादा विधाते माजी खासदार विकास महात्मे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके इत्यादींची भाषणे झाले


            भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अशोक चोरमले यांनी विविध मागण्यांचे प्रस्ताव सदर केले. त्यात विमुक्त भटक्या समाजाच्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करून संख्या निश्चिती, शासनाने 31 ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिवस म्हणून साजरा करणे, अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाच्या सर्व योजना विमुक्त भटक्या समाजाला लागू करणे,  सर्व विद्यापीठात विमुक्त भटक्यांचे अभ्यास केंद्र स्थापन करणे,  विमुक्त समाजाच्या कला संस्कृती व भाषा जतन करण्यासाठी संग्रहालय स्थापन करणे,  पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या  विमुक्त भटक्या समाजाला स्वामित्वधन (रॉयल्टी) मध्ये सवलत मिळणे,  केंद्राच्या सूचनेनुसार  विमुक्त भटक्या समाजासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तक्रार निवारण व सल्लागार समिती तात्काळ स्थापन करणे, विमुक्त भटक्या समाजासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांना लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करणे,  शासनाच्या सर्व योजनांमध्ये एससी एसटी नंतर विमुक्त भटके  समाजाला प्राधान्य असावे,  मंत्रालयीन विभागचे नाव विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण विभाग असे पूर्ववत करावे व त्यासाठी स्वतंत्र मंत्री व राज्यमंत्री असावा, आश्रम शाळांमध्ये सध्या निवासी विद्यार्थ्यांची संख्या १२० आहे ती १८० करावी व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण  देण्यासाठी विशेष योजना तयार करावी, भटक्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावी यासाठी विशेष अभ्यास क्रम तयार करून आश्रमशाळामध्ये सुरू करावा..जातीच्या दाखल्यांच्या पुरावाच्या अटीत बदल करणे असे विविध प्रस्ताव चोरमले यांनी सादर केले.


            यावेळी प्रदेश सरचिटणीस गोविंदा गुंजाळकर, राजू साळुंखे, शिवाजी आव्हाड, देविदास राठोड, संतोष आव्हाड, धरमसिंग राठोड, महिला प्रदेश अध्यक्ष डॉ उज्वलाताई हाके, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश सचिव युवराज मोहिते, युवक अध्यक्ष अमोल गायकवाड, युवती अध्यक्ष भाग्यश्री ढाकने, विदर्भ संयोजिका रश्मी जाधव, सहसंयोजक डॉ पंकज भिवटे,   महिला विभाग संयोजक जयश्री राठोड,   नागपूर महिला जिल्हा अध्यक्ष प्रीती कश्यप, ग्रामीण अध्यक्ष सीमा कश्यप, अर्चना कोटेवार अर्चना बलसागर गजानन भोरळ, अनिल राऊत, हिरामण साखरे, शांताराम वंदरे, दीपमाला पाल, मंगेश पुरी व  महाराष्ट्रतील भटके विमुक्त आघाडीचे सर्व राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय  पदाधिकारी तसेच महिला, युवक व युवती विभागाचे प्रतिनिधी अधिवेशनात उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post