स्मशानभूमीच्या ठरवास महापौरच जबाबदार - भैय्या गंधे

 
नगर- सावेडीतील प्रस्तावित स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा खरेदीचा ३२ कोटी रूपये खर्चाचा ठराव किंवा या व्यवहाराशी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही संबंध नाही. किंबहुना पक्षाचा या दोन्ही गोष्टीला विरोधच आहे, असा स्पष्ट निर्वाळा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भैय्या गंधे यांनी केला आहे. हा ठराव किंवा व्यवहाराला पीठासीन अधिकारी या नात्याने सर्वस्वी महापौरच जबाबदार आहेत, असा दावाही गंधे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.

याबाबत पत्रकात गंधे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव किंवा विषयाला व्यक्तिशः मी व भाजपाच्या नगरसेवकांनी कोणत्याही स्वरूपात पाठिंबा दिलेला नाही किंवा त्याचे सम र्थनही केले नाही. उलटपक्षी या एकूणच विषयाला पक्ष म्हणून भाजप व पक्षाच्या नगरसेवकांचाही विरोधच केला आहे. हे ज्ञात असतानाही शहरात विनाकारण पक्षाची बदनामी केली जात आहे. महापालिकेत शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस अशा महाविकास आघाडीची सत्ता आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून भाजप मनपात विरोधक म्हणून कार्यरत असून, ही भूमिका पक्षाने वेळोवेळी सक्षमपणे बजावली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post