धनगर समाजातील नव्या पिढीने समाज एकत्रिकरणासाठी काम केले पाहिजे :- आण्णासाहेब डांगे

 धनगर समाजातील नव्या पिढीने समाज एकत्रिकरणासाठी काम केले पाहिजे आरक्षण प्रश्नांवर समाजाने गंभीर होण्याची आवश्यकता आहे. राज्यकर्ते वेळ काडूपणा करत असुन आरक्षण व समाज एकत्रिकरणावर सर्वानी एकजुटीने राहिले पाहिजे*

. आण्णासाहेब डांगे
जामखेड (वार्ताहर) धनगर समाजातील नव्या पिढीने समाज एकत्रिकरणासाठी काम केले पाहिजे, आरक्षण प्रश्नांवर समाजाने गंभीर होण्याची आवश्यकता आहे. राज्यकर्ते वेळ काडू पणा करत असुन आरक्षण व समाज एकत्रिकरणावर सर्वानी एकजूटीने राहिले पाहिजे, समाजातील सुज्ञ वर्गाने याचा अभ्यास केला पाहिजे, धनगर समाजाचा मेंढपाळीचा उद्योग बुडला त्याचे पुनर्वसन झाले नाही ते व्हायला पाहिजे होते. परंतु समाजाने मनात आणले तर काहीही होवू शकते म्हणून सर्वांनी कामाला लागा, यश खेचुन आणा असे प्रतिपादन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक, मार्गदर्शक, महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री . आण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले.

चौंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन समारंभात ते बोलत होते. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पुजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र मल्हार सेनेचे सरसेनापती मा. बबनराव रानगे यांनी केले. यावेळी बोलताना मा. आण्णासाहेब डांगे पुढे म्हणाले कि, आम्हाला शांततेच्या व सामज्यस्याच्या मार्गाने राज्यातील समाजाला एकत्र आणावयाचे आहे. परंतु समाजात ऐकी नाही जो तो उठतो व मी आरक्षण देतो म्हणतो व चुकिच्या पध्दतीने आरक्षणाची मागणी करतो यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. जरा एकिने व सामज्यस्याने राहिलो असतो तर आरक्षणाचा प्रश्न मागेच सुटला असता. आमच्या दृष्टीने आरक्षण मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील काही मंडळी कसे बसे तरी वाघतात यामुळे समाजाची पिछे हाट झाली आहे.

महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. श्री. आण्णासाहेब डांगे, महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार अँड. रामहरी रूपनवर यांचा सत्कार सुनिल मलगुंडे, संभाजीराव कचरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व फेटा देवून करण्यात आला.

यावेळी बोलताना महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार मा. अँड. रामहरी रूपनवर म्हणाले कि, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती व पुण्यतिथीला महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी दर वर्षी चौंडीला यायलाच पाहिजे. आजच्या तरूण पिढीने अहिल्यादेवीचे विचार समजावून घेतले पाहिजेत. गेल्या अनेक वर्षापासुन चौंडीचा विकास हा मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांच्यामुळेच होत आहे. मा. डांगेसाहेब यांनी पूर्ण वेळ देवून या ठिकाणी पर्यटन स्थळ बनविले आहे. चौंडी हे गांव पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे. या ठिकाणी सर्वाना दर्शन मिळेल अशी व्यवस्था आहे. पुण्श्लोक अहिल्यादेवीचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याचा इतिहास समजावून घेतला पाहिजे, काहीही झाले तरी धनगर आरक्षण प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही.

यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, महासंघाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रा. अरूण घोडके, महाराष्ट्रप्रदेश सरचिटणीस मा. श्री. सुनिलभाऊ वाघ, कर्मचारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रा. अंकुशराव निर्मळ, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा मा. डॉ. अलकाताई गोडे, मा. श्री. शिवाजीराव ढेपले यांची धनगर समाजाच्या निरनिराळ्या प्रश्नांसह आरक्षण प्रश्नावरती भाषणे झाली. उपस्थित अन्य मान्यवरांचा सत्कार मल्हार सेनेचे संदीपभाऊ तेले, प्रकाश कनप, गणपती वाटेगांवकर, अविनाशनाना शिंदे, अविनाश खरात यांच्या हस्ते करण्यात आला. अभिवादन समारंभाचे संयोजन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, सुनिल मलगुंडे, सुनिल शिनगारे,अजित पाटील,विजय पाटील यांनी केले.

यावेळी अहिल्या महिला संघाच्या माजी प्रदेशाध्यक्षा पुष्पाताई गुलवाडे, कर्मचारी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. संभाजीराव बैखरे, धनाजीराव सातपुते, श्री. छगनराव नांगरे, नागनाथ गाडेकर, हरिभाऊ कोळेकर, संदीपराव तेले, अमर ढोणे, शहाजी सिद, भगवान बोते, संताजी गावडे, बाबासो सिद, उमेश गावडे, प्रकाश एडगे, विलास काळेबाग यांचेसह राज्यभरातुन धनगर समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

अभिवादन समारंभाचे सूत्रसंचान श्री. बजरंग कदम यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली, अभिवादन मेळाव्याच्या निमित्ताने पिवळ्या रंगाचे झेंडे लावण्यात आले होते. अभिवादन समारंभाचे नियोजन अत्यंत नेटके व सुत्रबध्दपणे करण्यात आले होते, शेवटी आभार नागपूर विभागीय अध्यक्ष श्री. युवराज घोडे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post