डॉ.ना.ज.पाउलबुधे शैक्षणिक संकुलात ‘समूह राष्ट्रगीत गायन’

नगर -भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव उत्साहात पार पडला. स्वराज्य महोत्सव अंतर्गत आज 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या÷डॉ.ना.ज.पाउलबुधे शैक्षणिक संकुलात समुह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र शासन व उच्च शिक्षण संचलनालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे या शैक्षणिक संकुलनात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, बी.एड., डीटीएड्, फार्मसी, महिला व रात्र महाविद्यालय आदिंचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
सकाळी 11 वा. राष्ट्रगीत गायन करुन सर्वांनी वंदे मातरम्, भारत माता कि जय च्या घोषणा दिल्या. या समुह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी निर्मलनगर, वसंत टेकडी, श्रीराम चौक, पाईपलाईन रोडवरील सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर शांत उभे राहून राष्ट्रगीतात सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post