श्रीराम चौकात ध्वजारोहण व मानवंदना
नगर - भारतीयांचा प्रदीर्घ स्वातंत्र्य लढा, पारतंत्र्यांतून भारताला मुक्त करण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले संसार दूर सारले, प्रचंड यातना सहन केल्या, शेकडो क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आज भारताचा अमृत महोत्सवाचा सुवर्ण दिवस आपल्याला दिसला. तेव्हा त्या स्वातंत्र्यसेनानीं, क्रांतीकारकांनी स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी जे अतुलनीय शौर्य दाखवले ते आपण कोणीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
वसंत टेकडी जवळ, श्रीराम चौकात साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सामुदायिक ध्वजारोहण, मानवंदना देऊन वंदे मातरम्च्या घोषणा देत तिरंगा रॅली काढली. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, मेजर योगेश क्षीरसागर, मेजर किरण परदेशी, गंगाधर भोसले, मधुकर भुतकर, देवीदास गुडा, अमर मेट्टू, एकनाथ खिलारी, शेखर धाडगे, दिनेश कुलकर्णी, अण्णा चांदकोटी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणाले, भारतभुमी ही पुण्यवंतांची भुमी आहे. देशासाठी त्याग, बलिदान करणारे आपण सारे भारतवासी आहोत. संपूर्ण जगाला शांततेचा मंत्र आपणच दिला, त्यामुळेच स्वातंत्र्य, समता, बंधूतता येथे नांदत आहे.
यावेळी चौकात ध्वजारोहण मेजर क्षीरसागर व परदेशी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर तिरंगा रॅली काढून, भारत माता कि जयच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी इंद्रप्रस्थ लाठी-काठी टिमने प्रात्याक्षिके सादर केली
Post a Comment