६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त कुंकूमार्चन लघुपट आपल्या शहराचा अभिमान आ.संग्राम जगताप

 
अहमदनगर- आपल्या शहराची नाट्य सांस्कृतिक चित्रपट क्षेत्रातील आलेख वेगाने वाढत असून नुकताच ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली यात  नॉन फिचर फिल्म या गटात अनुष्का मोशन पिक्चर्स प्रस्तुत उद्योजक व निर्माते श्री.नरेंद्र शांतिकुमार फिरोदिया,श्री.पुष्कर तांबोळी, श्री. प्रणित मेढे निर्मित,श्री.अभिजित अरविंद दळवी लिखित दिग्दर्शित कुंकूमार्चन या लघुपटला पुरस्कार जाहीर झाला ही आपल्या शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे असे प्रतिपादन आ.श्री.संग्राम जगताप यांनी केले.निर्माते,दिग्दर्शक,कलाकार तंत्रज्ञ यांचा आ.श्री.संग्राम जगताप यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.माणिकराव विधाते,नगरसेवक श्री.प्रकाश भागानगरे,प्रवक्ते प्रा.श्री.अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट,साहित्य व सांस्कृतिक विभाग शहर अध्यक्ष श्री.श्रेणीक शिंगवी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ जिल्हा समन्वयक श्री.शशिकांत नजान यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी आ.संग्राम जगताप बोलत होते. ते पुढे म्हणाले की कलेला राजाश्रय हवा असतो कलाकारांच्या पाठीशी  श्री.नरेंद्र फिरोदिया खंबीर पणे उभे असतात. सांस्कृतिक क्षेत्रात अहमदनगरचा लौकिक अर्थाने दबदबा वाढत आहे येथील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांना आपली सर्वोतोपरी मदत असेल,शहरातील चित्रीकरण स्थळांना परवानगी साठी एक खिडकी योजना साठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू,नाटकाच्या सरावासाठी हॉल,नाट्यगृह बाबतच्या अडचणी,तांत्रिक मदत हवी असल्यास कलाकारांनी आपल्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.
कुंकूमार्चन लघुपटाच्या निर्मितीची माहिती श्री.नरेंद्र फिरोदिया,श्री.अभिजित दळवी ,श्री.पुष्कर तांबोळी यांनी दिली.
सूत्रसंचालन श्री.शशिकांत नजान यांनी केले तर आभार श्री.श्रेणीक शिंगवी यांनी केले.
या वेळी तंत्रज्ञ श्री.नाना मोरे, सौ.बिल्वा दळवी,श्री.प्रणित मेढे, श्री.कौस्तुभ केळकर,श्री.अक्षय देशपांडे,श्री. नितीश कटारिया,श्री. सारंग देशपांडे,सिद्धांत खंडागळे, कलाकार विद्या जोशी,श्री.बंडू झिंजूरके,श्री.रावसाहेब आळकुटे,श्री. विवेक जोशी, श्री. जयदीप फंड, श्री.शुभम घोडके उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post