ज्योतिष व्यवसाय नव्हे तर सेवाभाव आहे - तुषार घाडगे
नगर - ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास नसलेले काही जण केवळ चंद्र राशीनुसार सर्वसामान्य रत्न सुचवितात परंतु कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे महादशा/ अंतर्दशा स्वामींच्या रत्नाला जास्त महत्त्व असते. समाजात आज एकही जण असा नाही की ज्याला काही समस्याच नाही प्रत्येकाला कोणती ना कोणती समस्या असतेच यावर उपाय असतोच ज्योतिष व्यवसाय नव्हे तर सेवाभाव आहे .या भावनेने हस्तरेषेवरून समस्या तुमची उपाय आमचा या मार्गाने व्यवसायाकडे सामाजिक भावनेने पाहण्याचा दृष्टिकोन माझा असतो .असे प्रतिपादन प्रख्यात ज्योतिष तुषार घाडगे यांनी केले. भिंगार येथील ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत विविध विषयांवर येणाऱ्या अडचणींवर काही उपाय मार्ग काढण्यासाठी झालेल्या मार्गदर्शन बैठकीत श्री घाडगे बोलत होते . सेवानिवृत्ती नंतरही आपण चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करतो पण कौटुंबिक समस्यांमुळे आपला आनंद लोप पावतो . मुला-मुलींच्या भविष्याची काळजी ,नातवाचे कसे होईल .या समस्या विचाराने आपण हैराण होतो या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा झाली. श्री घाडगे यांनी याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की ज्योतिष व्यवसायाबरोबरच आपण सेवाभावी वृत्ती जोपासतो आतापर्यंत अनेक तरुणांना नोकरी व्यवसायात यश मिळण्यासाठी विवाह होण्यासाठी योग्य ती रत्न देऊन, जन्म कुंडली मधील काही दोष असतील तर ते जाण्यासाठी आपल्या कुळदैवताबाबत करावयाची पूजा -अर्चा संदर्भात सखोल माहिती दिली. जीवनातील विवाह हा एक गंभीर प्रश्न सध्या मुला- मुलीं समोर आहे मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. ज्या मुली लग्नाच्या आहेत त्या मुली मोठ्या अपेक्षा मुलांकडून ठेवतात त्या अपेक्षा मुलांना मानवतीलच असे नाही. त्यामुळे विवाह योग जुळत नाही. व्यवसायात अपयश, संतती योग ,साडेसाती, पुनर्विवाह या समस्येवर अचूक व अनुभवी उपायांमुळे लक्ष्मी ज्योतिष कार्यालय या माध्यमातून मी वेगळी ओळख करून दिली ती टिकवण्यासाठी तरुणांना ,समस्याग्रस्त लोकांना अत्यंत अल्प दरात कामे करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम केल्याने सर्वांचे समाधान होत आहे .असे श्री घाडगे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
Post a Comment