नगर - तपावेन रोड ते गोकूळधाम या शिवरस्त्याच्या झालेलेल्या दुरावस्थेबाबत मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन जाधव, काका शेळके यांना निवेदन दिले. यावेळी महेश तोडमल, शंकर रोडे, नवनाथ थोरात, अमित अडागळे, विजय जाधव, डॉ.रमेश कराळे, सुर्यकांत रोडे, ए.पी.दिवटे, दिनेश रुद्रे आदि उपस्थित होते.
सावेडी उपनगराातील प्रभाग 1 मधील गावडे मळा भागातील गोकूळधाम अपार्टमेंट, तपोवन रोड या शिवरस्त्याची मोठी दुरावस्ता झाली आहे. या रस्त्यांच्या आसपास मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली असून, अनेक कॉलनी, अपार्टमेंट झालेल्या आहेत. या नागरिकांना असणारा सदरचा रस्ता हा शिवरस्ता असून, पावसामुळे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामुळे या भागातील सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी अनेक वेळा नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिकेकडे पाठपुरवठा केला, परंतु महापालिकेचे कोणतेही अधिकारी किंवा पदाधिकारी या भागात फिरकले सुद्धा नाही. रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डेच-खड्डे पडले असून, पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचत आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहे. नागरिकांना जीव मुठीत धरुन या रस्त्याने जावे लागत आहे. या परिस्थितीचा व्यावसायिकांवरही मोठा परिणाम झाला आहे.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले, तपोवनच्या शिवरस्त्याबाबत अनेकवेळा मनपाकडे निवेदने देण्यात आली, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांनी आपणाकडे तक्रार केल्यानंतर आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. रस्त्यांची खरोखर दुरावस्था झाली आहे, याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरवा करुन सदर रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी रोहित चांदवले, विजय जाधव, विश्वनाथ खेडकर, अ.क.काकडे, धिरज सायंबर, विष्णू भंडारी, दादासाहेब ठोंबरे, दशरथ राठोड आदिंसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------
Post a Comment