भगवान गौतम बुद्ध यांच्याजयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने वंदन भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आजही योग्य मार्ग दाखवते- महेंद्र गंधे

 

भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने वंदन

भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आजही योग्य मार्ग दाखवते

- महेंद्र गंधे

     नगर - सत्य आणि अहिंसा या दोन गोष्टींचं समर्थन करून भगवान गौतम बुद्धांनी  बौद्ध धर्माची  स्थापना केली. त्यांनी सांगितलेली वचनं, तत्त्वज्ञान  आजही जीवनात भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवतात. गौतम बुद्धांची वचनं वाचल्यानंतर माणसाच्या मनातले सर्व गोंधळ दूर होऊन जीवनाचा योग्य मार्ग नक्कीच गवसतो. भगवान गौतम बुद्धांचे विचार हे सर्व जगभर आचरणत आणले जातात. शांतीचा संदेश देणार्‍या भगवान बुद्धांचे जीवनकार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरक आहे, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.

     भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने वंदन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, अनुसूचित जाती शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, महिला जिल्हाध्यक्षा कुसूम शेलार, अ‍ॅड.किरण भिंगारदिवे, बाळासाहेब भुजबळ, इंजि.परिमल निकम, प्रा.डोंगरे, रोहन शेलार आदि उपस्थित होते.

     यवेळी किशोर डागवाले  म्हणाले, भगवान गौतम बुद्धांनी मानवी जीवन समस्या, अडी-अडचणींनी व्यापलेलं आहे. जीवनातली प्रतिकूल परिस्थिती, समस्यांवर मात करताना, जीवनाचा योग्य मार्ग शोधताना अनेकांना नैराश्य येतं, हताश वाटतं. माणसानं जीवनातल्या समस्यांवर, नैराश्यावर आणि प्रश्नांवर कशा प्रकारे तोडगा काढवा आणि जीवन सुखकर कसं करावं, याविषयीचं मार्गदर्शन करुन मानवी जीवन सुकर बनविले आहे. हाच विचार अनंत काळापर्यंत टिकून राहिल, असे सांगितले.

     कार्यक्रमाच्या प्रास्तविकात कुसूम शेलार यांनी भगवाान गौतम बुद्धांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. शेवटी चंद्रकांत पाटोळे यांनी सर्वांचे आभार मानले.

-

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post