अहमदनगर : नेवासा तालुक्यातील एका गावातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न घेता पोलिसांनी त्रास दिला असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. याची दखल घेत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असुन त्याच्या जागेवर प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विजय करे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी संबंधित तक्रारदार व ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदनही दिले. निरीक्षक पोवार यांना तत्काळ निलंबित करा व मुलीचा शोध घ्यावा. दोन दिवसात मुलीचा शोध न लागल्यास उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेवुन पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.
Post a Comment