इस्लामपूर ( वार्ताहर) संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे आमदार प्राध्यापक . जयंतराव आसगांवकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष . अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या हस्ते आमदार प्राध्यापक आसगांवकर साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार आसगांवकर यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना उजाळा देत महाराष्ट्राची जडण-घडण कशी झाली यावरती प्रकाश टाकला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासात रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, याबरोबरच संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थासारख्या संस्थांनी शैक्षणिक क्रांती घडवून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडवला. याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील, स्वर्गीय बापूजी साळुंखे या सारख्या महान व्यक्तीमत्त्वांची आठवण आज होत आहे. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या जडण-घडणीत माजी मंत्री माननीय अण्णासाहेब डांगे यांनी शैक्षणिक क्रांती घडवली आहे ती वाखानण्याजोगी आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिन या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री. संभाजी कचरे, आष्टा नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. वीर कुदळे, माजी उपनगराध्यक्ष श्री. रघुनाथ जाधव, पी. एल. घस्ते, सुरेंद्र शिराळकर, मदन यादव आदी मान्यवरांचा संस्थेच्या पदाधिकार्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माननीय आमदार श्री. जयंत आसगांवकर यांच्या हस्ते अटल टिंकरिंग लॅबचे व आष्टा- सांगली रोडवरील संस्थेच्या भव्य कमानीपासून ते संस्थेच्या गेटपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी माननीय आमदार श्री. आसगांवकर यांच्या आमदार फंडातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला.
यावेळी अण्णासाहेब डांगे इंग्लिश मेडियम स्कूल व अण्णासाहेब डांगे कला अँकँडमी यांच्यावतीने महाराष्ट्राचे गौरव गीत सादर करण्यात आले.
यावेळी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे नूतन संचालक श्री. आप्पासाहेब पुजारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संपतराव पाटील, सचिव अँड. राजेंद्र उर्फ चिमण डांगे, इंजिनीरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. विक्रम पाटील, बी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डाँ. एम. जी. सरलया, पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. सुभाष पाटील, शैलेंद्र हिवरेकर, दीपक अडसूळ, संतोष मोहिते, संजय चव्हाण, सतीश चव्हाण, सुधीर थोरात, ए. जे. पाटील व सर्व शाखांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके संयोजन संस्थेचे व्यवस्थापक श्री. सुनील शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पाटील, विजय पाटील, रघुनाथ बोते, अशोक घोरपडे, अजित माने, सुशांत घोरपडे, अधिक कुठे, आप्पासाहेब आळुळे, दिग्विजय मोरे, संकेत डांगे, आदींनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय डी. एड. कॉलेजचे प्राचार्य श्री. शंकर पाटील यांनी करून दिला. आभार फार्मसी कॉलेजचे सुजित देसाई यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. ए. के. पाटील यांनी केले.
Post a Comment