अहमदनगर प्रधान डाकघर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी.

अहमदनगर: अहमदनगर प्रधान डाकघरमध्ये मा श्री संदीपजी कोकाटे प्रभारी सिनियर पोस्टमास्तर व मा श्री एस रामकृष्ण प्रवर अधिक्षक डाकघर यांचे प्रमुख उपस्थितीत महामानव,भारतीय घटनेचे शिल्पकार,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  मोठ्याउत्सवात साजरी करण्यात आला.
यावेळी पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ बाबासाहेबजी आंबेडकर यांचे अतुलनीय कार्या विषयी सविस्तरपणे माहिती दिली.
यावेळी श्री राजू राहिंज,श्री सतिष येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी  आदरणीय डॉ बाबासाहेबजी आंबेडकर  मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन  मनोरंजन कक्षाच्यावतीने युवा नेते श्री प्रदिप सूर्यवंशी, श्री कमलेश मिरगणे,श्री दिपक नागपुरे यांनी केले.
यावेळी श्री रमीत रोहिला,श्री राधाकिसन  मोटे,श्री अजित रायकवाड,श्री सुरज गायकवाड,श्री  दिपक जेसवानी,श्री आनंद भोंडवे, श्री विजय चाबुकस्वार,श्री झुंबरराव विधाते यांचे सह मोठ्या संख्येने डाक कर्मचारी उपस्थित होते.
जयंती उत्सवाच्या निमित्ताने शनिवार दि 16 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रधान डाकघर येथे स्नेहालयातील,व अनामप्रेम मधील काही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात येणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post