माता भगिनींचा पाठीराखा सुनिल भाऊंना शालिनीताईंनी दिली शाबासकीची थाप

      नगर  (विजय मते) अडचणीत असलेल्या मातांना, संकटात सापडलेल्या भगिनींचा पाठीराखा म्हणून सदैव उभा राहणार्‍या सुनिल भाऊंना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे यांनी भरगच्च झालेल्या महिलांच्या सन्मान सोहळ्यात त्यांच्या कार्याचे कौतुक करुन सत्कार-सन्मानाने शाबासकीची थाप दिली. या सत्कारामुळे सुनिल भाऊंनी केलेल्या खर्‍या सत्कार्याचा सन्मान आज झाला.
     दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून वसंत टेकडी येथील संदेशनगरला द्वारकामाईंच्या साई दरबारात विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या तसेच समाजासाठी उल्लेखनीय काम करणार्‍या 51 महिलांचा ‘नारी शक्तीचा सन्मान’ सोहळा पार पडला. या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून सौ.विखे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते माहिला पोलिस, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, आशासेविका, डॉक्टर्स, सिस्टर्स, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या अशा महिलांना गौरवण्यात आले.
     यावेळी पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी, नगरसेविका संध्या पवार, डॉ.ज्योती दीपक, अंजली देवकर, डॉ.वैशाली किरण, कांचन बिडवे, सीमा त्र्यंबके, डॉ.हेमांगी पोतनीस आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
     या निमित्ताने या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक सुनिल त्र्यंबके यांनी गेल्या 9 वर्षांपासून महिलांविषयी आदर, सन्मानाची भावना ठेवून, कचरा वेचणार्‍या, साफ-सफाई करणार्‍या महिलांपासून ते डॉक्टर्स, वकिल, पोलिस, कराटेपटू, महिला बचत गटांच्या ताईंसह सर्व क्षेत्रात काम करणार्‍या संघर्षशिल महिलांचा महिला दिनानिमित्त आदराने बोलावून त्यांना मान सन्मान देत आहेत.
     आमचा सन्मान तुम्ही दरवर्षी करता पण तुमच्या कार्याची दखल आम्ही नाही घेणार तर कोण घेणार? असा प्रश्न शालिनीताईंनी सन्मान सोहळामध्ये उपस्थित करुन सुनिल भाऊंना मोठ्या आदराने स्टेजवर बोलावून सत्कार केला. असेच कार्य सुरु राहण्यासाठी आशिर्वाद देऊन केलेल्या कामाचे कौतुक करुन शाबासकीची थाप दिली.
     या सत्काराला उत्तर देतांना सुनिल त्र्यंबके म्हणाले कि, साईबाबांच्या प्रेरणेने मला उर्जा मिळते, मी काही करीत नाही. बाबा माझ्याकडून करुन घेतात. प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्य करताना त्याला नगरसेवक पदाची जोड सर्वांच्या आशिर्वादाने मिळाली हे कार्य असेच सुरु राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
     यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, बबलू सूर्यवंशी, महेश टाक, आकाश त्र्यंबके आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post