भाजपाने प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे:-प्रा.राम शिंदे



    नगर - भाजपाची मुख्य ताकद संघटनेत आहे, प्रत्येक बुथवर प्रभावी काम हा त्याचा मुख्य गाभा आहे. हे संघटन 24 तास कार्यरत आहे. देश प्रथम हे धोरण, प्रखर देशप्रेम ही ओळख आणि घराणेशाहीमुक्त पक्ष. देश प्रथम या धोरणाचा पहिले पक्षाध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांनी केला होता. पक्षाच्या स्थापनेपासून अनेक स्थितांतरी पाहिली आहे. शेवटच्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे, ही पक्षाची भुमिका राहिला आहे. त्यामुळे यासाठी काही काळ जरी गेला असला तरी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने खर्‍या अर्थाने पक्षाच्या अंतोदय मुल्यांवर ठाम राहत देशातील तळागळापर्यंतच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.  पक्षाच्या कार्यकर्त्यांची शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याची शिकवण पक्षाला आज जगात नंबर एकचा पक्ष बनविले आहे. यापुढेही अशीच घौडदोड सुरु राहिल, असा विश्वास भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केले.

    भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त शहर जिल्हा भाजपच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयात भारत मातेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, विधानसभा प्रमुख शशांक कुलकर्णी, सुरेखा विद्ये, मालनताई ढोणे आदि उपस्थित होते.

    यावेळी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे म्हणाले, जनसंघातून निर्माण झालेल्या भारतीय जनता पक्षाने स्थापनेनंतर देश हिताला प्राधान्य देत मोठे संघटन उभे केले. अनेकांनी जातीवादी पक्ष म्हणून हेटाळणी केली, भाजपाचे हिंदूत्व हे धार्मिक नसून सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे भारतीय जीवनाची ती शैली आहे. नगरमध्येही भाजपाने आपल्या कार्याने खासदार, महापौर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक लोकप्रतिनिधी दिले आहेत. आज शहरास जिल्ह्यात पक्षाची मजबूत स्थिती असून, आगामी काळात जिल्हा भाजपमय झालेला दिसेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करावे, असे आवाहन केले. पक्षाच्यावतीने वरिष्ठ पातळीवरुन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम सुरु असल्याचे भैय्या गंधे यांनी सांगितले.

    याप्रसंगी संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक म्हणाले, भाजपाच्या वर्धापन दिनानिमित शहर भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी गांधी मैदान येथील भाजपा कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रम, भारत माता प्रतिमा पुजन, ध्वजारोहण, यानंतर शहरातून बाईक़ रॅली काढण्यात आली. शक्ती केंद्र प्रमुखांच्या निवासस्थानी नामफलक लावण्यात आला, अशी विविध कार्यक्रम संपन्न झाले.

    यावेळी वसंत राठोड, ज्योती दांडगे, महेश तवले आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले तर आभार तुषार पोटे यांनी मानले. कार्यक्रमास नगरसेवक रविंद्र बारस्कर, भैय्या परदेशी, पल्लवी जाधव, उपाध्यक्ष संतोष गांधी, शिवाजी दहिंडे, मंडल अध्यक्ष अजय चितळे, वसंत राठोड, बाळासाहेब गायकवाड, सचिन पारखी, महेश तवले, चंद्रकांत पाटोळे, विशाल खैरे, अमोल निस्ताने, सुमित बटुळे, अनिल गट्टाणी, बंटी ढापसे, प्रशांत मुथा, मिलिंद भालसिंग, अनंत जोशी, अजय ढोणे, पंकज जहागिरदार, जगन्नाथ निंबाळकर, अभय भळगट, मंगेश खंगले, मिनीनाथ मैड, विजय घासे, अशोक भोसले, महावीर कांकरिया, नितीन जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, सिद्धेश नाकाडे, छाया रजपुत, लिला आगरवाल, ज्योती दांडगे, कालिंदी केसकर, रेखा मैड, संध्या पावसे आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

-----------

    

1/Post a Comment/Comments

  1. The casino with roulette machines | Vannienailor4166 Blog
    Casino roulette game is one of the most popular casino games in Malaysia. septcasino.com It offers the latest games https://vannienailor4166blog.blogspot.com/ with the best odds, with gri-go.com big payouts titanium ring and easy deccasino

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post