इस्लामपूर (प्रतिनिधी)शेखरवाडी, ता. वाळवा येथील श्री. राहूल खोत यांच्या पत्नी सौ. पल्लवी राहुल खोत यांची एम. पी. एस. सी. परिक्षेतुन पोलिस उपनिरीक्षक, पी. एस. आय. पदी निवड झाल्याबद्दल घबकवाडी, ता. वाळवा येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. दिपकराव मारूती खोत यांच्या शुभहस्ते बुके देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
श्री. राहूल खोत व सौ. पल्लवी खोत या उभयतांनी अत्यंत कष्टातुन आपला प्रपंच उभा केला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाला महत्त्व देवून जिद्दीने व चिकाटीने अभ्यास केला व खुप परिश्रमाला यश आल्याचे नुतन पी. एस. आय. सौ. पल्लवी खोत यांनी यावेळी बोलताना सांगितले. जिद्द व ध्येयाची चिकाटी असेल व सतत प्रयत्नशील राहिल्यास यश हे नक्की मिळत राहते. माझ्या या यशाचे श्रेय माझ्या संपूर्ण परिवाराचे आहे असे हि त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी श्री. बजरंग कदम, अमितराव घबक, कृष्णात खोत, राहूल मुळीक, दिलिप कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक वैभव खोत यांनी केले व आभार हंबीरराव कदम यांनी मानले.
Post a Comment