अहमदनगर: अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालकपदी वाहननगरचे (व्हीआरडीई) सब पोस्टमास्तर किशोर नेमाने यांची पुढील पाच वर्षाकरिता निवड झाल्याची अधिकृतपणे घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही के मुटकुळे यांनी अधिकृत पत्राद्वारे केली.
त्यानिमित्ताने वाहननगर पोस्ट ऑफिसमध्ये आयोजित सत्कार प्रसंगी पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव बोलताना म्हणाले की,आपली या संस्थेवर संचालकपदी झालेली निवड ही आपण आजवर केलेल्या विधायक कामाची पावतीच आहे.संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करताना मोठी जबाबदारी असते. आपल्याकडून निश्चितच या जबाबदारीची जाणीव ठेऊन कामकाज होईल.आपल्यावर सभासदाने टाकलेल्या विश्वास पात्र राहत कारभार कराल.त्याच बरोबर संस्थेच्या सर्व सभासदाच्या हितास प्राधान्य द्याल,अशी अपेक्षा श्री संतोष यादव यांनी व्यक्त केली.
त्याची निवड झालेबदल त्याचा वाहननगर पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या यावेळी श्री सचिन मोरे,श्री सागर वाघमारे,श्री शिवाजी भापकर ,श्रीमती प्रतिक्षा ठाणगे,बळवंत माने,अनिल लोटके,नवनाथ शिंदे,विठ्ठल गिरवले, कैलास भालसिंग, श्रीमती राजश्री भिडे,श्रीमती सविता टकले उपस्थित होते.
Post a Comment