इस्लामपूर (वार्ताहर) मरळनाथपूर, ता. वाळवा, जि. सांगली येथील ग्रामदैवत मरळनाथाच्या शिखरावर व गाभाऱ्यात मा. सौ. निताताई खोत यांच्या वतीने सौर ऊर्जेवर चालणारे दिवे मंदिरात अर्पण
मरळनाथपूर येथील ग्रामदैवत मरळनाथ (वरचा देव ) येथे आज निरनिराळ्या सामाजिक कार्यात अग्रेसर व सक्रिय पणे सतत कार्यरत असणाऱ्या समाजसेविका मा. सौ. निताताई खोत यांच्या प्रयत्नातून मंदिराच्या शिखरावर आणि आतील गाभाऱ्यात दोन सौर ऊर्जेवर चालणाऱ्या लाईट जोडण्यात आल्या. या प्रसंगी राजाभाऊ खोत, राज खोत, कृष्णा खोत, दिलीपराव सांडगे, सुधीर सांडगे, शरद काका, महादेव खोत, विजय खोत यांची उपस्थितीत होती.
स्वागत प्रास्ताविक राज खोत यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलिपराव सांडगे यांनी मानले.
आदरणीय निताताई खोत यांच्या या सामाजिक उपक्रमाबाबत सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
Post a Comment