साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाध्यक्षपदी सुभाष सोनवणे

अहमदनगर (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने लोककला कलावंत, साहित्यिक परिषद,वडाळा महादेव  ता.श्रीरामपूर च्या वतीने  आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात येत असुन या संमेलनाच्या  अध्यक्षपदी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्यवाह,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कविवर्य सुभाष सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.अशी माहिती बाबासाहेब पवार यांनी दिली.
         रविवार दि. १७ एप्रिल रोजी श्रीरामपूर येथील व्हिआयपी गेस्ट हाऊस येथे सकाळी १०-३० वाजता या  संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत   श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे साहेब यांच्या शुभहस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव ससाणे राहणार आहेत, यावेळी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे,माढा चे सभापती शिवाजीराव ढवळे,सह बँक संचालक करण ससाणे,आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात,बाबासाहेब सौदागर,प्रा डॉ बाबुराव उपाध्ये, शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य चे  संस्थापक सचिव सुनील गोसावी,प्राचार्य शेळके यांच्यासह अनेक मान्यवर कवी लेखक, विचारवंत उपस्थित राहणार आहेत. 
कविवर्य सुभाष सोनवणे यांची साहित्यिक वाटचाल समृध्द असून डिसेंबर २०२१ च्या नांदेड येथील ६ व्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे व्यथीत सावल्या व स्नेहबंध ही  पुस्तके शब्दगंध कडून प्रकाशित झाली असून त्यांनी अनेक पुस्तकांना  प्रस्तावना लिहिली आहे.
 जयहिंद, मुसंडी चित्रपट व काही मराठी मालिकेतही त्यांनी अभिनय केला आहे. प्रबोधनात्मक कार्य म्हणून त्यांनी अनेक  व्याख्याने दिली आहेत, विज्ञानवादी प्रवचनाद्वारेही त्यांनी प्रबोधन केले आहे.
 मनमिळावू स्वभाव असलेले सुभाष सोनवणे शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य चे कार्यवाह,  निसर्ग मित्र समिती महाराष्ट्र चे  राज्य उपाध्यक्ष आहेत. 
अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल  शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी, भगवान राऊत,प्रा.डॉ.अशोक कानडे,शाहिर भारत गाडेकर,राजेंद्र फंड,मिराबक्ष शेख,डॉ किशोर धनवटे,प्रा डॉ कैलास कांबळे,कैलास साळगट,डॉ.अनिल पानखडे,डॉ.गणी पटेल यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post