स्व.दिलीप गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहर जिल्हा भाजपाच्यावतीने अभिवादन

 





     नगर - एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेतृत्व म्हणून ज्यांचा उल्लेख होते, ते म्हणजे माजी मंत्री स्व.दिलीप गांधी होय. भारतीय जनता पार्टीला नगर जिल्ह्यात सर्वदूर पसरविण्याचे काम त्यांनी केले. पक्षाची भुमिका सर्वांना पटवून देऊन त्यांनी पक्ष संघटन तर केलेच परंतु त्याचबरोबर भाजपाचे खासदार म्हणून जिल्ह्यात खाते खोलले. खासदार काय असतो हे स्व.दिलीप गांधी यांच्या रुपाने जनतेला कळले. त्यानंतर जनतेने त्यांना तीनवेळेस खासदार केले व पक्षाने त्यांचा योग्य तो सन्मान करत केंद्रात मंत्रीपद दिले. आपल्या कार्यकाळात केंद्र व राज्य सरकारचा निधी उपलब्ध करुन देत नगर शहरासह जिल्ह्यातील विविध विकास कामांना चालना दिली. अनेक विकास कामांचा डोंगर उभा करुन एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची उणीव कायम राहील, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.


     माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहर जिल्हा भाजपाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, सुनिल रामदासी, सुवेंद्र गांधी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उपाध्यक्ष संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, महिला मोर्चाच्या अध्यक्ष अंजली वल्लाकट्टी, नगरसेवक प्रदिप परदेशी, रविंद्र बारस्कर, पंकज जहागिरदार, चेतन जग्गी, निशांत दातीर, प्रशांत मुथा, गोपाल वर्मा, विजय बडे, स्वप्नील लाहोर, ज्ञानेश्वर धिरडे, अभिजित ढोणे, नितीन जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, महावीर कांकरिया, अमोल निस्ताने, चंद्रकांत पाटोळे, मिलिंद भालसिंग आदि उपस्थित होते.


     सुनिल रामदासी म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या काळात काही मोजक्या कार्यकर्त्यांनी पक्ष उभारीत योगदान दिले, त्यात स्व.दिलीप गांधी यांचे नाव अग्रक्रमाने येते. खासदार म्हणून त्यांनी विकासाचा जो अजेंटा जिल्ह्यात राबवून भाजप पक्षाचे जाळे जिल्ह्यात निर्माण केले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देत जिल्ह्यात पक्षाचा दबदबा निर्माण केला. त्यांनी पाहिले विकासाचे स्वप्न आपण यापुढे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे ही त्यांना श्रद्धांजली ठरेल.


     यावेळी तुषार पोटे यांनी स्व.दिलीप गांधी यांच्या नगरसेवक ते खासदार व केंद्रीय मंत्री तसेच भाजपाच्या विविध पदावरील कारकीर्दीवर प्रकाश टाकला. शेवटी संतोष गांधी यांनी सर्वांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post