नगर - देशातील एक मोठी लोकसंख्या गरीब आणि महिला कामगारांची आहे. महिलांना स्वत:चं आयुष जगण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी महिलांची ही समस्या सोडविण्यासाठी केंद्र सकारच्यावतीने महिलांना मोफत शिलाई मशिन देण्याची योजना सुरु केली आहे, अशी माहिती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन दर महिन्याला चांगली कमाई करता येऊ शकते. मोफत शिलाई मशिन गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी उपलब्ध करुन देते. मोफत शिलाई मशिन योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागाती महिलांना घेता येऊ शकतो. या मशिनमुळे महिला कुटूंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घ्यावा, असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू महिलांनी अर्जासोबत आधार कार्ड, जन्मदाखला, आयकर प्रमाणपत्र, ओळखपत्र दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, शिलाई मशिन चालविण्याचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो सह भैय्या गंधे यांचे जनसंपर्क कार्यालय, बन्सी महाराज स्वीट्स समोर, गुलमोहर रोड, सावेडी, अ.नगर फो.नं:- 0241-2553050 येथे संपर्क साधावा.
Post a Comment