वंचित व उपेक्षित सर्व जातीच्या लोकांना संवैधानिक अधिकार मिळावा - कल्याणराव दळे
नगर (विजय मते) राज्यातील ओबीसी समाजासोबत वंचित व उपेक्षित असलेल्या सर्व जातीच्या लोकांना संवैधानिक अधिकार मिळावा व या सर्व समाजातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे, यासाठी ओबीसी बहुजन नेते कल्याणराव दळे हे राज्यभर दौरे करत आहे. श्रीगोंदा तालुका दौर्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
राज्यातील सर्व वंचितांना, उपेक्षितांना न्याय देण्यासाठी नवीन दिशा देण्यासाठी शुक्रवारी 25 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई येथे होणार्या राज्यव्यापी ओबीसी बहुजन परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले.
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय चेचर, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश राऊत, ओबीसी नेते राजू(दादा) गोरे, रविंद्र क्षिरसागर,आजीम भाई जकाते, भगवानराव खोमणे, रफीक इनामदार,संजय डाके, वामनराव बदे नाभिक संघटनेचे अध्यक्ष विजय भाऊ क्षिरसागर, कांतीलाल कोकाटे,सोमनाथ कदम,शरद शिंदे,दिलीपराव शिंदे, मदन गडदे,इंद्रजीत कुटे, शहराध्यक्ष राजेंद्र कुटे, धनंजय पंडित,सचिन गोटे, अक्षय काळे,नाना क्षिरसागर, विशाल गोरे, कांताराम पवार,अर्जुन शिंदे,महादेव राऊत, राजेंद्र त्र्यंबके, बापू कसबे,गणेश शिंदे,किरण पांडुळे,संतोष भोसले,रामदास बनकर,मनोहर शिंदे, दत्तात्रेय क्षिरसागर, काका पवळ,महेश क्षिरसागर,गणेश टाक व श्रीगोंदा तालुक्यातील ओबीसी बहुजन प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील ओबीसी बहुजन कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारा बलुतेदार, अलुतेदार,एसबीसी,भटके विमुक्त, व्हि.जे.एन.टी,मुस्लिम, ओ.बी.सी, आदिवासी एससी सहीत इतर सर्व वंचित असलेल्या जात समूहाच्या सर्व माहिती अधिकाराची बाजू या परिषदेमध्ये मांडणार आहे, असे श्री.कल्याण दळे यांनी स्पष्ट केले.
---------
Post a Comment