पुरलेली मढी पुन्हा उकरून काढून पसरणाऱ्या दुर्गंधीस सामाजीक जिवन खराब करण्याची संधी सर्वोच्च न्यायलयाने देवू नये :माजी मंत्री अण्णा डांगे

पुरलेली मढी पुन्हा उकरून काढून पसरणाऱ्या दुर्गंधीस सामाजीक जिवन खराब करण्याची संधी सर्वोच्च न्यायलयाने देवू नये
 माजी मंत्री अण्णा डांगे 
इस्लामपूर (वार्ताहर)या चित्रपटाच्या निर्मितीला न्यायालयाने सामाजीक गढूळता टाळण्यासाठी अनुमती न देता बंदी घालावी असेच आता सर्व साधारण समाजाचे मानस आहे . " मी नथुराम बोलतोय " या एकपात्री नाटकातुन नथुरामच्या भूमिकेचे समर्थन करण्यात आले असले तरी समाजाने ते समर्थन स्विकारलेले नाही . भडक डोक्याच्या माथे फिरूंच्या मतांना आपण असे महत्व देवून पुन्हा पुन्हा त्याची उजळणी करत बसलो तर देशाच्या आणखी एका फाळणीला सामोरे जावे लागेल . अशा वातावरणाच्या निर्मितीस सर्व स्तरावर विरोध करून सामाजीक ऐक्य अधिक मजबूत करण्याची आज आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री  अण्णासाहेब डांगे यांनी दिली.

खासदार मा. अमोल कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करायला मा . पवारसाहेबांची अनुमती नाकारून नकार दिला ती त्यांना सुचलेली सुबुध्दी होय . कारण नाटकी पणाने का होईना " मी नथुराम बोलतोय " असे देवदुत असल्या सारखे गांधी हत्येचे समर्थन करणे हा निच पणाचा कळसचं नव्हे काय ? नथुरामच्या म्हणण्यात एक किंचीत हि तथ्य असते तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फाशी का दिली सर्वोच्च न्यायालयाची तेव्हाची चुक म्हणायची का.?नथुरामने केलेल्या गांधी हत्येचे कोणत्याही स्तरावर कोणत्याही स्थितीत समर्थन होवू शकत नाही अशी प्रतिक्रिया. अण्णासाहेब डांगे यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post