जिल्ह्यात २५ टक्के लोकसंख्या असणाऱ्या धनगर समाजाला जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थान दिले नाही.भटक्या व मागासलेल्या या समाजाचे प्रश्न कोण मांडणार व समाजाचा विकास कसा होणार म्हणून समाजात तीव्र असंतोष व संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशी भावना इंजि डी आर शेंडगे यांनी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून नेहमीच या समाजाला विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जातं नाही अशी खंतही समाज मांडत आहे. समाज पोटासाठी मेंढपाळ म्हणून भटकंती करत असताना अनंत अडचणींना सामोरं जात असतो. धनगर वाडयांवर रस्ते,पाणी,वीज यांची सोय नाही.समाजाला जिल्हा परिषदेतही प्रतिनिधित्व नाही.आता जिल्हा नियोजन समिती मध्येही स्थान नसल्याने समाजाचे प्रश्न जिल्हा प्रशासनापुढे कोणी मांडत नाहीतरी याची दखल सन्मानिय पालकमंत्री यांनी घ्यावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे
Post a Comment