स्नेडर इलेक्ट्रिक कंपनीतर्फे निलेश अर्जुन शिंदे पॅरिसला रवाना


     नगर - येथील सीक्युएव्हीमधील निवृत्त कर्मचारी अर्जुन शिंदे यांचे सुपूत्र निलेश शिंदे यांची स्नेडर इलेक्ट्रिक कंपनीच्यावतीने पॅरिस येथे बढतीवर निवड झाली आहे. नुकतेच ते पॅरिसला रवाना झाले असून, या कालावधीत ते आधुनिक तंत्रानाचा अभ्यास करणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. अर्जुन शिंदे, देवगांव ग्रामपंचायत सदस्या आशा शिंदे यांचे ते चिरंजीव आहेत.

     श्री.निलेश शिंदे हे बेंगलोर येथील स्नेडर कंपनीत गेल्या 15 वर्षे कार्यरत असून,  त्यांच्या  क्रियाशिल अनुभव व कार्य तत्परतेमुळे त्यांची बढती होऊन त्यांची पॅरिस येथे इंटरनॅशनल ऑफिसमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यानिमित्त त्यांचा परिवार व देवगाव ग्रामस्थाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दीप्ती शिंदे, नितीन बोठे, सविता बोठे, अर्जुन शिंदे, आशा शिंदे, संभाजी शिंदे, शीतल शिंदे, राजवीर, राजलक्ष्मी, ईश्वरी, मनवा, कार्तिकी आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

-------

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post