नगर - राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याने प्रत्येक मंत्री आपआपल्या पद्धतीने निर्यण घेऊन मोकळे होत आहेत. या निर्णयाचा जनतेला फायदा होईल की तोटा याचे काही देणे घेणे नाही. फक्त आपले कार्यकर्ते पोसण्याचे काम सुरु आहे. कोरोनाच्या आडून मोठे राजकारण करत आहे. प्राथमिक, माध्यमिक, तांत्रिक शिक्षणाबाबत कोणतेच ठोस धोरण नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. सत्तेतील प्रत्येक व्यक्ती हा स्वत:चाच स्वार्थ पाहू राहिला आहे. हे सरकार म्हणजे अहंकाराचा महामेरु आहे. त्यामुळे येणार्या काळात जनता त्यांना आपली जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात पोटनिवडणुकीत दिसून येत आहे. नगरमध्ये भाजपाचे काम चांगले असून पुढील काळात नगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची सत्ता असेल, असे प्रतिपादन मुंबई भाजपचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी केले.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार नगरमध्ये आले असता त्यांचे भाजपाच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी संपर्क कार्यालयात स्वागत केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अॅड.अभय आगरकर, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, संतोष गांधी, सचिन पारखी, चेतन जग्गी, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, भिंगार अध्यक्ष वसंत राठोड, सुरेखा विद्ये, गीता गिल्डा, अंजली वल्लाकट्टी, कुसूम शेलार, नगरसेविका सोनाली चितळे, प्रदिप परदेशी, अनिल गट्टाणी, ज्ञानेश्वर काळे, अजय चितळे, शशांक कुलकर्णी, प्रा.सुनिल पंडित, नितीन जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, अविनाश साखला, सुमित बटूळे आदि उपस्थित होते.
यावेळी भैय्या गंधे म्हणाले, नगरमध्ये पक्षाच्यावतीने बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून पक्षाचे काम वाढत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवित आहेत. त्याचप्रमाणे भाजपप्रणित केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाचे कार्यकर्ते करत असल्याची माहिती आ.शेलार यांना दिली.
याप्रसंगी तुषार पोटे यांनी पक्षाच्या कार्याचा आढावा सादर केले. ज्येष्ठ नेते अॅड.अभय आगरकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर महेश नामदे यांनी आभार मानले. यावेळी आ.शेलार यांनी कार्यकर्त्यांना तिळगुळ वाटून संवाद साधला.
यावेळी चंद्रकांत पाटोळे, ज्ञानेश्वर घेरडे, बाळासाहेब सानप, साहिल शेख, सुधाकर भोसले, किशोर कटोरे, राजू मंगलाराम् आदिंसह भाजपाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चा आघाडी, वकिल आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, उद्योग आघाडी आदिंचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment